‘माझी तुझी रेशीमगाठ’ फेम परीचा ‘चका चक’डान्स

व्हिडीओ नक्की पाहा   

Updated: Jan 9, 2022, 03:54 PM IST
‘माझी तुझी रेशीमगाठ’ फेम परीचा ‘चका चक’डान्स title=

मुंबई : ‘माझी तुझी रेशीमगाठ’ फेम परी म्हणजे  मायरा वायकुळ आता सर्वांची लाडकी झाली आहे. मायराचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. आता देखील मायरा म्हणजे परीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये मायराने अभिनेत्री सारा अली खानच्या 'चका चक' गाण्यावर ठेका धरला. व्हिडीओमध्ये 'चका चक' गाण्यावर डान्स करताना मायरा अतिशय सुंदर आणि क्यूट दिसत आहे. 

'चका चक' गाण्यावर डान्स करताना तिच्या चेहऱ्यावरील हावभाव प्रचंड गोड आहे. मायराच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. एवढंच नाही तर अनेकांनी कमेंट करत सारा अली खानला टॅग केलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सध्या सोशल मीडियावर 'चका चक' गाणं ट्रेंड करत आहे. पण गाण्यावर मायराने धरलेला ठेका नेटकऱ्यांना विशेष प्रेमात पाडत आहे.  ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेबद्दल सांगायचं झालं तर अभिनेत्री प्रार्थना बहरे आणि मायरा वायकुळ ही जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे.