मुंबई : चित्रपटगृह सुरू झाल्यापासून बॅालिवूड आणि मराठी सिनेमे एकापाठोपाठ एक रिलीज होत आहेत. अशा या स्पर्धेत ‘झिम्मा’ चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यातही ‘हाऊसफुल्ल’चे आपले स्थान कायम ठेवले आहे.
पहिल्या आठवड्यात ‘झिम्मा’चे 325 शोज झाले. तर दुसऱ्या आठवड्यात आता 700 हून अधिक शोज प्रेक्षकांनी एन्जॉय केले आहेत. त्यामुळे लॅाकडाऊनंतरचा 'झिम्मा' हा पहिला मराठी सुपरहिट चित्रपट ठरला आहे.
सिनेमाची मोठी कमाई
झिम्मा या सिनेमात तगडी स्टार पाहायला मिळत आहे. अनेकांनी हा सिनेमा आपल्या फॅमिलीसोबत पाहिला,तर काहींनी हा सिनेमा आपल्या मित्रमंडळींसोबत पाहिला आहे. पहिल्या आठवड्यात या सिनेमाने 2 कोटी 98 लाखांची कमाई केली. तर 10 दिवसात अवघ्या 4 कोटी 71 लाखांचा गल्ला जमावला.
दुसऱ्या आठवड्यात सुद्धा सिनेमाने आपली घोडदौड सुरुच ठेवली. आणि प्रेक्षकांना झिम्माचे शो एन्जॉय करायला भाग पाडलं. या सिनेमाची उत्तम माऊथ पब्लिसिटी देखील या सिनेमाचं शोज हाऊसफुल होण्यामागचं मोठं कारण आहे.
'झिम्मा' चित्रपटाला मिळणाऱ्या प्रचंड प्रतिसादाबद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, '' सर्वप्रथम 'झिम्मा'ला मिळत असणाऱ्या प्रेमाबद्दल मी सर्व मराठी प्रेक्षकांचे आभार मानतो. त्यांच्या या पाठिंब्यामुळे एक प्रकारचे बळ मिळाले आहे. या चित्रपटाला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे प्रेक्षकांचे मराठी चित्रपटसृष्टीवर किती प्रेम आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
विशेष म्हणजे शासनाच्या नियमांनुसार पन्नास टक्के सीट्सची परवानगी असूनही कोरोनाबद्दलच्या भीतीवर मात करत, प्रेक्षक चित्रपटगृहांमध्ये येऊन चित्रपटाचा आनंद घेत आहेत.’’