'यंदाच्या वर्षी कोटी रूपयांची पारितोषिकं गोविंदा मंडळात का वाटत नाहीत?'

मराठी दिग्दर्शक केदार शिंदे यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केला. 

Updated: Aug 12, 2020, 11:15 AM IST
'यंदाच्या वर्षी कोटी रूपयांची पारितोषिकं गोविंदा मंडळात का वाटत नाहीत?' title=

मुंबई : दर वर्षी देशात प्रत्येक सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. पण यंदाच्या वर्षी कोरोना महामारीमुळे खबरदारीचा उपाय म्हणून सर्व सणांवर बंदी घालण्यात आली आहे. आज तर दहीहंडी... मात्र सगळ्या गोविंदा मंडळांमध्ये शुकशूकाट पाहायला मिळत आहे. कोटी रूपयांची पारितोषिकं जाहीर करणारे राजकारणी मंडळी देखील आज शांत आहेत. तेव्हा या वर्षी राजकारणी मंडळी गोविंदा मंडळात ती रक्कम का वाटत नाहीत असा प्रश्न दिग्दर्शक केदार शिंदे यांनी उपस्थित केला. 

केदार शिंदे ट्विट करत म्हणाले की, 'या वर्षी दहीहंडी नाही. कुठलेच सण साजरे करता येत नाहीत. पण कोटी कोटीची पारितोषिकं दरवर्षी जाहीर करणारे राजकारणी , या वर्षी ती रक्कम गोविंदा मंडळात का वाटत नाहीत? या वर्षी त्यांनी या 'थराला' जाऊन काम करावंच! ' असं ते म्हणाले. 

दरम्यान, फक्त देशातच नाही तर संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले आहे. देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या २३ लाख २९ हजार ६३९ इतकी झाली आहे. त्यापैकी ६ लाख ४३ हजार ९४८ रुग्णांवर उपचार सुरू  आहेत. 

दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत १६ लाख ३९ हजार ६००  रुग्णांनी कोरोनावर मात केली असून ४६ हजार ९१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधीक आहे. राज्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५ लाख ३५ हजार ६०१ इतकी झाली आहे.