घरभाडं द्यायला गेले आणि नगरसेवकानं मला... तेजस्विनी पंडितचा खळबळजनक खुलासा

Tejasswini Pandit: अभिनेत्री तेजस्विनी पंडित आपल्या अभिनय कौशल्यानं आणि सुंदर अदाकारीनं मराठीच काय जगभरातील प्रेक्षकांची मनं जिंकून आहे. तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) सोशल मीडियावर पण अक्टिव असते. 

Updated: Dec 18, 2022, 05:53 PM IST
घरभाडं द्यायला गेले आणि नगरसेवकानं मला... तेजस्विनी पंडितचा खळबळजनक खुलासा  title=
tejaswini pandit

Tejasswini Pandit: अभिनेत्री तेजस्विनी पंडित आपल्या अभिनय कौशल्यानं आणि सुंदर अदाकारीनं मराठीच काय जगभरातील प्रेक्षकांची मनं जिंकून आहे. तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) सोशल मीडियावर पण अक्टिव असते. त्यामुळे तिच्या बोल्ड आणि ब्युटीफूल फोटोंनी ती आपल्या चाहत्यांचे कायमच लक्ष वेधून घेत असते. तेजस्विनी अनेकदा उघडपणे बोलताना आणि आपली मतं मांडताना दिसते. सोशल मीडियावरही ती व्यक्त होताना दिसते. अशातच आता तिने सांगितलेला एक अनुभव सर्वांचेच लक्ष वेधून घेते आहे. सध्या सगळीकडेच तिच्या या अनुभवाची चर्चा आहे. पण नक्की तिनं काय सांगितलं याबद्दल या लेखात जाणून घेऊया.  (marathi actress tejaswini pandit shares her experience corporater house rent career marathi news)

मराठी चित्रपट, मालिका आणि ओटीटी विश्वात (ott) तेजस्विनीनं आपलं अढळ स्थान निर्माण केलं आहे. तेजस्विनी उत्तम अभिनेत्रीचं नाही तर तेजाज्ञा (tejadnya) ब्रॅण्डची मालकही आहे. आता तिनं निर्मितीक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. तिच्या क्रिएटिव्ह वाईब या प्रॉडक्शन हाऊसमधून तिनं नुकतीच अथांग नावाची वेबसिरिज प्रोड्यूस केली आहे. सध्या ही वेबसिरिज प्रेक्षकांना भलतीच आवडली आहे. काही महिन्यांपुर्वी रानबाजार (Rannbazaar) या वेबसिरिजमधून वेगळ्या तऱ्हेची आव्हानात्मक भुमिका केली होती. परंतु सतत चर्चेत असणाऱ्या तेजस्विनीनं सध्या आपला एक अनुभव नेटकऱ्यासोबत शेअर केला आहे. यावर तिला तऱ्हेतऱ्हेच्या कमेंट्स येत आहेत. 

सध्या अथांग (Athaang) या वेबसिरिजनं सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. या सिरिजची तेजस्विनी पंडित प्रोड्यूसर आहे. अथांगच्या निमित्तानं दिलेल्या एका मुलाखतीतं तेजस्विनीनं त्या एका अनुभवाविषयी सांगितले आहे. तिनं या मुलाखतीत आपल्या करिअरच्या सुरूवातीचा अनुभव सांगितला आहे. त्या काळात एका नगरसेवकानं आपल्याला एक ऑफर दिली होती यावर तिनं खुलासा केला आहे. तेजस्विनीनं सांगितलं की, तेव्हा मी पुण्यातील सिंहगड रोडला राहत होते. घराचे भाडे देण्यासाठी त्या नगरसेवकाच्या ऑफिसला गेले होते. तेव्हा मला कळलं खरं तर की आपल्या या मनोरंजन क्षेत्राकडे पाहण्याचा इतरांचा दृष्टीकोन कसा असतो ते. आपल्यातीलच काही लोकांनी या क्षेत्राविषयी गैरसमज तयार केले आहेत असं निरिक्षण तिनं नोदंवलं आहे. 

तेजस्विनी पंडित मी सिंधूताई सपकाळ (Mi Sandhitai Sapkal) या चित्रपटापासून प्रेक्षकांमध्ये भलतीच लोकप्रिय झाली. या चित्रपटानंतर तिला एक वेगळी ओळख मिळाली. सध्या मनोरंजन विश्वात बोल्ड(Bold) आणि ब्यूटीफुल म्हणून तेजस्विनीची ओळख आहे. तिचे सोशल मीडियावरही खूप फोलोअर्स आहेत. तेजस्विनीला आता नव्या प्रोजेक्टमध्ये पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत.