कुशल बद्रिकेने केली नवीन सुरुवात, म्हणाला 'तुमचा आशीर्वाद...'

कुशल बद्रिकेने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने त्याच्या आगामी हिंदी कार्यक्रमाचा प्रोमो शेअर केला आहे. 

Updated: Mar 9, 2024, 08:02 PM IST
कुशल बद्रिकेने केली नवीन सुरुवात, म्हणाला 'तुमचा आशीर्वाद...' title=

Kushal Badrike Madness Machayenge Show : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय विनोदी कार्यक्रम म्हणून चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाला ओळखले जाते. गेल्या 10 वर्षांपासून सुरु असलेला हा कार्यक्रम आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. काही दिवसांपूर्वी या कार्यक्रमातून अभिनेता-सूत्रसंचालक निलेश साबळेने तब्येतीच्या कारणामुळे एक्झिट घेतली. यानंतर कुशल बद्रिकेने झी मराठी वाहिनीसह 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमासाठी भावूक पोस्ट शेअर केली होती. आता कुशल बद्रिकेने एक नवीन सुरुवात केली आहे.

कुशल बद्रिके हा 'चला हवा येऊ द्या या' कार्यक्रमामुळे घराघरात पोहोचला. कुशल बद्रिके हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. तो नेहमी विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतो. कुशल बद्रिकेने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने त्याच्या आगामी हिंदी कार्यक्रमाचा प्रोमो शेअर केला आहे. यात कुशल बद्रिके दिसत आहे. 

आणखी वाचा : 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रम बंद होणार? कुशल बद्रिकेच्या पोस्टमुळे चर्चांना उधाण, म्हणाला 'कामाचं प्रेशर आणि...'

या पोस्टला कॅप्शन देताना त्याने त्याच्या नवीन सुरुवातीबद्दल भाष्य केले आहे. "आजपासून नवीन सुरुवात होते आहे. तुमचा आशीर्वाद पाठीशी असुद्या. तुमच्या शुभेच्छांची खूप खूप गरज आहे. sony हिन्दीवर, शनिवार रविवार 9:30 वाजता", असे कुशल बद्रिकेने म्हटले आहे. त्यावर अनेक कलाकारांनी कमेंट करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री सुकन्या मोने यांनी "क्या बात है" अशी कमेंट केली आहे. तर अभिनेता संतोष जुवेकरने "मी बघणार आज कुशल बद्रिके भावा तोडून टाक, आय लव्ह यू" अशी कमेंट केली आहे. 

आणखी वाचा :  'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमाला रामराम करणार का? कुशल बद्रिके म्हणाला...

दरम्यान कुशल बद्रिके हा लवकरच सोनी टीव्ही या वाहिनीवरील ‘मॅडनेस मचायेंगे’ या कार्यक्रमात झळकणार आहे. ‘मॅडनेस मचायेंगे’ हा नवा कार्यक्रम ‘कपिल शर्मा शो’ च्या जागी सुरु होणार आहे. या हिंदी कार्यक्रमात कुशल बद्रिके आणि श्रेया बुगडे झळकणार आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हुमा कुरेशी करणार आहे. तिच्यासोबत प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन हर्ष गुजरालही दिसत आहे. या कार्यक्रमात कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, गौरव दुबे, केतन सिंग, अंकिता श्रीवास्तव, पारितोष त्रिपाठी, स्नेहिल मेहरा, इंदर सहानी हे विनोदवीर देखील झळकणार आहेत.