Marathi Actress Mumbai Local Train Bad Experience : ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अश्विनी कासारचे लाखो चाहते आहेत. अश्विनी ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकतीच अश्विनीनं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत अश्विनीनं तिला सार्वजनिक ठिकाणी प्रवास करताना त्यातही ट्रेननं प्रवास करताना आलेल्या अनुभवाविषयी सांगितलं आहे.
अश्विनीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अश्विनी ही लोकलनं प्रवास करत असल्याचे दिसते. तर त्यावेळी घडलेल्या एका घटनेविषयी सांगताना अश्विनी म्हणाली 'या बाईंचं नाव मला माहित नाही. ट्रेनमध्ये यांना माझ्या सीटवर पाय समोर ठेऊन बसायचं होतं. मी नकार दिल्यावर मला लाथ मारण्यात आली. भांडणात मी मराठी भाषा वापरली तर त्यांना त्याचाही प्रॉब्लेम होता. मी पब्लिक इमेज आहे हे कळल्यावर मला धमक्या देण्यात आल्या. माझा मुंबई पोलीस आणि रेल्वे पोलिसांवर पूर्णपणे विश्वास आहे.'
ही पोस्ट इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत अश्विनीनं मुंबई पोलीस आणि रेल्वे पोलिसांना देखील टॅग केलं आहे. अश्विनीनं शेअर केलेल्या व्हिडीओत काही आवाज येत नसला तरी समोर बसलेली महिला ही चिडल्याचे दिसून आले. ती महिला ही अश्विनीशी रागात बोलत होती. दरम्यान, आता सोशल मीडियावर तिचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय.
अश्विनीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिनं पोलिसांकडे तिनं तक्रार केली आहे. इतकंच नाही तर या सगळ्या प्रकरणात इतरांना जे वाटत होतं की ती अमराठी महिला होती. तर तसं नसून ती मराठीच होती फक्त इंग्रजीत भांडत होती असं अश्विनीनं स्पष्ट केलं.
दरम्यान, अश्विनीश कासारच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ या मालिकेत दिसते. ही मालिका सोनी मराठीवर सध्या सुरु आहे. तर याआधी अश्निनी ही ‘सावित्रीजोती’, ‘कमला’, ‘कट्टी बट्टी’, ‘मोलकरणी बाई – मोठी तिची सावली’ या मालिकांमध्ये दिसली होती. अश्विनीच्या चाहत्यांविषयी बोलायचे झाले तर तिचे लाखो चाहते आहेत. अश्विनीचे इन्स्टाग्रामवर 154K फॉलोवर्स आहेत.
हेही वाचा : 'मला त्या लांब केसांच्या मुलीशी लग्न करायचं, तेव्हा आईनं...'; असं ठरलं होतं मिलिंद गवळीचं लग्न
सार्वजनिक ठिकाणी प्रवास करताना हा कोणालाही आलेला पहिला अनुभव नाही. तर या आधी देखील सोशल मीडियावर अनेकांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्यात ते देखील सार्वजनिक ठिकाणी त्यांना आलेले अनेक अनुभव सांगताना दिसतात.