'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेसंदर्भातील वक्तव्यासाठी अलका कुबल यांनी मागितली माफी

त्या असं काही म्हणून गेल्या होत्या ज्यामुळं ....   

Updated: Nov 3, 2020, 05:55 PM IST
'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेसंदर्भातील वक्तव्यासाठी अलका कुबल यांनी मागितली माफी  title=
छाया सौजन्य - इन्स्टाग्राम

मुंबई : मराठी मालिका विश्वात सध्या अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड, अलका कुबल  यांची नावं चर्चेत आहेत. यामागच्या कारणांचीही बरीच चर्चा सध्या सुरु आहे. याचदरम्यान आता दिग्गज अभिनेत्री अलका कुबल यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्या व्हिडिओमध्ये त्या हात जोडून माफी मागताना दिसत आहेत. 

मालिकेसंदर्भातील वाद आणि त्याबाबतच्या चर्चा सुरु असतानाच त्याबाबत बोलताना आपण छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला, ही चूक सर्वांपुढं आणत आपल्याला छत्रपती शिवाजा महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत नितांत आदर असल्याचं त्या म्हणाल्या. शिवाय अनावधानानं आपल्याकडून त्यांचा एकेरी उल्लेख झाल्यास त्याबद्दल त्यांनी मनापासून दिलगिरी व्यक्त केली. 

 
 
 
 

A post shared by Alka Kubal Athalye (@alkakubal_23) on

इन्स्टाग्रामवर त्यांनी याबाबतचा व्हिडिओ पोस्ट केला. बऱ्याच चर्चेत असणाऱ्या ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेच्या निर्मात्या आणि काळुबाईची भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल या अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडवर चांगल्याच भडकलेल्या दिसल्या. अलका कुबल यांनी तिच्यावर काही आरोपही केले ज्याविषयी एका मुलाखतीत बोलताना त्यांच्या तोंडून छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख झाला. ज्यानतंर त्यांनी जाहीर माफी मागितल्याचं पाहायला मिळालं.