रणदीप हुड्डाच्या 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटाबद्दल शरद पोंक्षेंची पोस्ट, म्हणाले 'मी बघून...'

 या चित्रपटात रणदीप हा वीर सावरकरांच्या भूमिकेत झळकत आहे. त्यासोबतच या चित्रपटाचे दिग्दर्शन, सह-लेखन आणि सह-निर्मिती रणदीप हुड्डाने केली आहे. 

Updated: Mar 23, 2024, 07:18 PM IST
रणदीप हुड्डाच्या 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटाबद्दल शरद पोंक्षेंची पोस्ट, म्हणाले 'मी बघून...' title=

Sharad Ponkshe On Swatantrya Veer Savarkar Movie : मराठी अभिनेते शरद पोंक्षे हे कायमच त्यांच्या रोखठोक वक्तव्यामुळे कायमच चर्चेत असतात. ते नेहमी त्यांच्या व्याख्यानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. शरद पोंक्षे यांना सावरकरवादी म्हणून ओळखले जाते. ते कायमच त्यांचे विचार मांडत असतात. आता शरद पोंक्षेंनी रणदीप हुड्डा दिग्दर्शित 'स्वातंत्र्यवीर सावरकर' या चित्रपटाबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांच्या एका पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. 

रणदीप हुड्डाचा बहुचर्चित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट 22 मार्चला सर्वत्र प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा थंड प्रतिसाद मिळताना दिसत आहेत. आता शरद पोंक्षे यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी अद्याप हा चित्रपट पाहिला नसल्याचे सांगितले आहे. तसेच हा चित्रपट न पाहण्याबद्दलचे कारणही त्यांनी या पोस्टमध्ये नमूद केले आहे. 

शरद पोंक्षे नेमकं काय म्हणाले?

शरद पोंक्षे यांनी रणदीप हुड्डाच्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. त्याला कॅप्शन देताना त्यांनी या चित्रपटाबद्दल भाष्य केले. "प्रत्येकाने पहायला हवा. मी दुसऱ्या सिनेमात व्यस्त आहे. म्हणून मला अजून बघणं जमलं नाही. पुढील दोन दिवसात मी बघून एक छान व्हिडिओ करून प्रसारित करणार आहे. हे सांगण्याचं कारण खूप लोक मला विचारताहेत की तुम्ही चित्रपटाबद्दल काही का बोलला नाहीत तर सिनेमा अधिक बघावा आणि मग सविस्तर त्यावर बोलावं असं ठरवलेलं आहे. पुढील चार दिवसात माझा व्हिडिओ येईलच", असे शरद पोंक्षेंनी या पोस्टमध्ये म्हटले आहे. 

'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटाचे कलेक्शन किती?

दरम्यान ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटातून विनायक दामोदर सावरकर यांचे जीवनपट उलगडण्यात आले आहे. या चित्रपटात रणदीप हा वीर सावरकरांच्या भूमिकेत झळकत आहे. त्यासोबतच या चित्रपटाचे दिग्दर्शन, सह-लेखन आणि सह-निर्मिती रणदीप हुड्डाने केली आहे. तर अभिनेत्री अंकिता लोखंडे ही वीर सावरकरांच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. 

हा चित्रपट मराठी आणि हिंदी अशा दोन्हीही भाषेत प्रदर्शित करण्यात आला आहे. मराठीमध्ये 'स्वातंत्र्यवीर सावरकर' यांना सुबोध भावेचा आवाज देण्यात आला. पण या चित्रपटाला प्रेक्षकांचा फार कमी प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी फक्त 1.15 कोटींची कमाई केली आहे.