अभिनेता प्रशांत तपस्वी व्हेंटिलेटरवर, कलाकारांनी केलं मदतीचं आवाहन

मित्रहो मदतीसाठी पुढे या 

Updated: Jan 30, 2019, 11:15 AM IST
अभिनेता प्रशांत तपस्वी व्हेंटिलेटरवर, कलाकारांनी केलं मदतीचं आवाहन  title=

मुंबई :  'अ ब क', 'वळू', 'चिंटू', 'रिंगण' या चित्रपटांमध्ये झळकलेल्या अभिनेता प्रशांत तपस्वी सध्या रुग्णालयात असून, सध्या ते एका अडचणीचा सामना करत आहेत. अभिनेता शशांक शेंडे यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहित याविषयीची माहिती दिली. इतकत नव्हे तर, या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी प्रशांत यांच्यासाठी आर्थिक मदतीचं आवाहनही केलं आहे. त्यांची ही पोस्ट इतर कलाकारांनीही शेअर करत प्रशांत यांच्या मदतीसाठी ते पुढे आल्याचं कळत आहे. 

तपस्वी हे रुग्णालयात दाखल असून, ते सध्या व्हेंटिलेटवर असल्याची माहिती या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून मिळत आहे. किडनी आणि हृदयाला सूज, त्यातच न्यूमोनिया झाल्याचंही त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलं. सध्या त्यांच्यावर स्वाईन फ्लूचे उपचार सुरु असून, या साऱ्यासाठी त्यांना आर्थिक मदत करण्याचं आवाहन शेंडे यांनी आपल्या कलाकार मित्रांना केलं आहे. 

'आपला सर्वांचाच चांगला मित्र प्रशांत तपस्वी हा थोडा हलाखीच्या परिस्थितीमध्ये आहे. सध्या त्याच्यावर संजीवनी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे आपण साऱ्यांनी मिळून त्याला आर्थिक मदत करुयात. ज्यांना जसं शक्य होईल तशी रक्कम प्रशांत तपस्वी यांच्या खात्यावर जमा करावी', असं त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलं आहे. सोबतच प्रशात सपस्वी यांच्या स्टेट बँक खात्याचा तपशीलही दिला आहे. सर्व मित्रमंडळींकजडून मदतीला ओघ सुरू झाल्यास ही रक्कम जवळपास दीड लाखांच्या घरात जाऊ शकते, असंही त्यांनी या पोस्टमध्ये मांडलं आहे. 

हे आहेत तपस्वी यांच्या बँक खात्याचे तपशील

Prashant Tapasvi
Account No. 20146249065
IFSC No..SBIN0008043