मनोज बाजपेयीच्या चाहत्यांसाठी दु:खद बातमी

बॉलिवूड अभिनेता मनोज बाजपेयीचे वडील आर के बाजपेयी यांना गंभीर अवस्थेत दिल्लीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Updated: Sep 17, 2021, 07:53 PM IST
मनोज बाजपेयीच्या चाहत्यांसाठी दु:खद बातमी title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता मनोज बाजपेयीचे वडील आर के बाजपेयी  यांना गंभीर अवस्थेत दिल्लीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. वडिलांच्या प्रकृतीची माहिती मिळताच मनोज वाजपेयी केरळहून दिल्लीला पोहोचला. तो केरळमध्ये त्याच्या पुढच्या प्रोजेक्टचं शूटिंग करत होता. एका सूत्रानंनुसार मनोज बाजपेयीच्या वडिलांची प्रकृती गंभीर आहे. बातमी ऐकल्यानंतर मनोज बाजपेयी वडील आणि कुटुंबियांसह दिल्लीला पोहोचला. तो केरळमध्ये आपल्या प्रोजेक्टचं शूटिंग करत होता.

जून महिन्यात मनोज बाजपेयीचे वडील आर के बाजपेयी यांची प्रकृती खालावली होती. त्यानंतर वडिलांच्या प्रकृतीची माहिती मिळताच मनोज वाजपेयी बिहारमधील गोनाहा येथील बेलवा बहूरी येथे त्यांच्या घरी पोहोचला. त्यानंतर अभिनेत्याने सांगितले होतं की, जेव्हा त्याला त्याच्या वडिलांच्या प्रकृतीविषयी माहिती मिळाली तेव्हा तो त्यांना भेटायला आला. चित्रपट होत राहतील, पण वडिलांसोबत वेळ घालवणं ही सर्वात मोठी संपत्ती आहे.

बिहारचे रहिवासी मनोज बाजपेयी हे शिक्षणासाठी दिल्लीला गेले होते. यानंतर तो चित्रपटांमध्ये करिअर करण्यासाठी मुंबईला गेला. मनोज बाजपेयीने बॉलिवूडच्या अनेक सर्वोत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तो 'द फॅमिली मॅन 2' या वेब सीरिजमध्ये शेवटचा दिसला होता.