एक व्यक्ती अभिनेत्री Alaya F च्या पोटावर मारतोय मुक्के; Video पाहून व्हाल हैराण

आलियाने तिच्या एक व्हिडीओ इन्स्टाग्राम (instagram) स्टोरीवर शेअर केला आहे.

Updated: Sep 9, 2022, 04:44 PM IST
एक व्यक्ती अभिनेत्री Alaya F च्या पोटावर मारतोय मुक्के; Video पाहून व्हाल हैराण title=
man punches bollywood alaya f stomach video viral on social media

Alaya F Video: बॉलिवूड अभिनेत्री आणि पूजा बेदीची (Pooja Bedi) मुलगी आलिया एफ (Alaya F ) ही कायम तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत असते. शिवाय आलिया एफ सोशल मीडियावरही (social media) मोठ्या प्रमाणात सक्रीय आहे. तो रोज फोटो किंवा व्हिडीओ (Video) शेअर करताना दिसते. सध्या तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. आलियाने तिच्या एक व्हिडीओ इन्स्टाग्राम (instagram) स्टोरीवर शेअर केला आहे. (man punches bollywood alaya f stomach video viral on social media)

आलिया एफवर एक व्यक्ती पोटावर मारताना दिसतं आहे. अरे घाबरु नका, हा व्हिडीओ आलिया एफच्या जिममधील आहे. तर व्हिडिओमध्ये पोटावर मारणारा व्यक्ती हा कदाचित तिचा ट्रेनर असू शकतो. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता आलिया सुरुवातीला एकदम ताठ उभी राहून त्या ट्रेनरचे पोटावर मुक्का मारताना दिसत आहे. पण नंतर ती त्याला म्हणते, 'बस आता नको.' आलियाचं हे प्रशिक्षण पाहून चाहते हैराण झालं आहे. तर सोबतच या ट्रेनिंगसाठी तिचं कौतुक पण करत आहेत. 

आलियाकडे सध्या अनेक चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ती 'यू-टर्न' (U Turn) मध्ये दिसणार आहे. याशिवाय ती कार्तिक आर्यनसोबत (KARTIK AARYAN)'फ्रेडी' (Freddy) चित्रपटात स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. आलिया आणि कार्तिकची जोडी पहिल्यांदाच पडद्यावर झळकणार आहे. काही काळापूर्वी तिने या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले होते. आलियाचा 'फ्रेडी' हा रोमँटिक थ्रिलर चित्रपट आहे जो एकता कपूर निर्मित आहे. तर या चित्रपटाचे दिग्दर्शक शशांक घोष आहेत.