'हॉटेलमधून बोलावून ऑडिशनच्या नावावर कपडे काढायला लावले अन्...' मल्याळम दिग्दर्शकाविरोधात अभिनेत्याची खळबळजनक तक्रार

Malayalam Actor Accuses Director Ranjith Forced Him To Remove Clothes : मल्याळम अभिनेत्यानं दिग्दर्शक रंजीतवर केले लैंगिक छळाचे आरोप...

दिक्षा पाटील | Updated: Aug 30, 2024, 01:43 PM IST
'हॉटेलमधून बोलावून ऑडिशनच्या नावावर कपडे काढायला लावले अन्...' मल्याळम दिग्दर्शकाविरोधात अभिनेत्याची खळबळजनक तक्रार title=
(Photo Credit : Social Media)

Malayalam Actor Accuses Director Ranjith Forced Him To Remove Clothes : मल्याळम चित्रपटसृष्टीत सध्या सुरु असलेल्या लैंगिक छळांच्या आरोपांची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहे. इंडस्ट्रीमध्ये महिलांना होत असलेल्या समस्यांवर हेमा कमिटीची रिपोर्ट समोर आल्यानंतर, अनेक अभिनेत्री समोर येऊन त्यांच्यासोबत घडलेल्या घटना सांगताना दिसत आहेत. त्याशिवाय मल्याळम चित्रपटसृष्टीतील अनेक मोठी नावं समोर आली आहेत. पण आता जी गोष्ट समोर आली आहे त्यानं सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे. 

एका मल्याळम अभिनेत्यानं चित्रपट दिग्दर्शक रंजीत विरोधात तक्रार दाखले केली आहे. अभिनेत्यानं रंजीत यांच्यावर लैंगिक छळ केल्याचा आरोप करत तक्रारीत म्हटलं आहे की दिग्दर्शकानं त्याला कपडे काढण्यासाठी मजबूर केलं होतं. एका तरुण मल्याळम अभिनेत्यानं चित्रपट दिग्दर्शक रंजीतवर आरोप करत सांगितलं की 2012 मध्ये त्याला ऑडिशनसाठी बंगळुरुच्या एका हॉटेलमध्ये बोलावण्यात आलं होतं. दिग्दर्शकानं त्याला कपडे काढण्यासाठी मजबूर केलं आणि त्याच्यावर लैंगिक छळ केला. 

अभिनेत्यानं हे देखील सांगितलं की त्याला वाटलं हे सगळं ऑडिशनचा भाग आहे. आरोपांमध्ये अभिनेत्यानं सांगितलं की लैंगिक छळ केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी रंजीतनं त्याला पैसे ऑफर केले. केरळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्यानं डायरेक्टर जनरल ऑफ पोलिसांकडे त्याची तक्रार नोंदवली होती आणि एस.आय.टी. या प्रकरणातील तपासात सहभागी करून घेणार आहे. 

केरळ सरकारनं हेमा कमिटीच्या रिपोर्टनुसार, मल्याळम इंडस्ट्रीमध्ये समोर आलेल्या लैंगिक छळाच्या आरोपींचा तपास करण्यासाठी स्पेशल इन्वेस्टिगेशन टीम बनवण्यात आली आहे. या एस.आय.टी मध्ये चार सीनियर महिला पोलिस ऑफिसर्स देखील असतील आणि हे मल्याळम चित्रपटामध्ये सुरु असलेल्या लैंगिक छळाच्या आरोपांवर तपास करत आहेत. 

हेमा कमिटीची रिपोर्ट समोर आल्यानंतर बंगाली अभिनेत्रीनं देखील रंजीत यांच्या विरोधात चुकीची वागणूक दिल्याचा आरोप केला. तिनं म्हटलं की 2009 मध्ये एका चित्रपटाच्या ऑडिशनसाठी रंजीत यांनी तिला चुकीची वागणुक दिली. अभिनेत्रीच्या आरोपांनंतर रंजीतनं केरळ चलचित्र अकादमीच्या चेअरमॅन पदावरून राजीनामा दिला होता. 

हेही वाचा : चित्रपटात बलात्कार दाखवू शकतात पण KISS नाही! सेन्सॉर बोर्डावर संतापली जोया अख्तर

दुसरीकडे मल्याळम इंडस्ट्रीमध्ये सुरु झालेल्या वादानुसार, इंडस्ट्रीतील कलाकारांच्या रक्षणासाठी बनवण्यात आलेल्या असोसिएशन ऑफ मल्याळम मूव्ही आर्टिस्ट्सच्या सगळ्या सदस्यांनी राजीनामा दिला. त्यात लोकप्रिय आणि दिग्गज मल्याळम अभिनेता मोहनलाल हे AMMA चे प्रेसिंडेट होते. त्यांनी असोसिएशनच्या एग्झीक्यूटिव्ह कमिटीच्या सगळ्या लोकांनी राजीनामा दिला. तर मल्याळम चित्रपटातील काही मोठ्या कलाकारांवर लैंगिक छळाचे आरोप आहेत.