मुंबई : अनेक दिवसांपासून मीडियापासून लपत असलेले मलायका आणि अर्जुन यांनी अखेर आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. दीपिका आणि रणवीर यांच लग्न बघून आता या दोघांना देखील हिम्मत आली आहे. दीपवीरच्या लग्नानंतर बॉलिवूडमधील हे कपल चर्चेत आहे. गुरूवारी उशिरापर्यंत चालणाऱ्या पार्टीत दोघांची जवळीक आणि त्याचे फोटो सध्या चर्चेत आहेत.
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्यातील नातं आता जगजाहीर होताना दिसत आहे. सगळ्या मित्रपरिवारात यांच्यातील जवळीक अधिक खुलून दिसत आहे. आता हे नातं काही लपलेलं नाही. या अगोदर मलायकाच्या वाढदिवशी हे कपल एअरपोर्टवर एकत्र दिसले. पण मीडियाला बघताच यांनी आपला मार्ग वेगळा केला. पण आता तसं नाही.
तर एका चॅनलच्या रिअॅलिटी शोमध्ये या दोघांनी अगदी रोमँटिक अंदाजात डान्स केला आहे. पण पब्लिकली आपलं नातं जाहिर करण्याची नवी संधी आहे. या अगोदर दोघेही आपलं नातं लपवताना दिसत.
या फोटोत मलायकाचे जवळचे मित्र आहेत. यामध्ये करिना कपूर, लहान बहिण अमृता अरोरा, सुझैन खान यासोबत आणखी एक खास चेहरा यामध्ये आहे. यामध्ये मलायकाची आधीची जाव म्हणजे सुहेल खानची पत्नी सीमा खान देखील होती.