रस्त्यावरचा कचरा उचलूनही ट्रोल झाली मलायका अरोरा, कारण...; Video Viral

Malaika Arora: मलायका अरोरा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या व्हिडिओमुळं ती पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: May 30, 2024, 04:14 PM IST
रस्त्यावरचा कचरा उचलूनही ट्रोल झाली मलायका अरोरा, कारण...; Video Viral title=
Malaika arora picked up garbage from roadside actress gets trolled

Malaika Arora: मलायका अरोरा सध्या फॅशन आयकॉन म्हणून झळकू लागली आहे. मलायकाचे जिमचे व्हिडिओ अनेकदा चर्चेत असतात. तसंच, पापराझीदेखील मलायकाचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करत असतात. असाच मलायकाचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. जिममध्ये जात असताना मलायकाला वाटेत कचरा पडलेला दिसतो. त्यानंतर ती वाटेतील कचरा उचलते. मलायच्या या कृत्याचे सोशल मीडियावर कौतुक जरी होत असलं तरी काही नेटकऱ्यांनी तिला चांगलंच सुनावलं आहे. नेमकं काय घडलं?

मलायका अरोरा बी-टाउनमधील सर्वात फिट अभिनेत्री म्हणून ओळखळी जाते. तिचे जिम लुक्स आणि स्टनिंग फोटोशूट इंटरनेटवर खूप व्हायरल होत असतात. मंगळवारी अभिनेत्रीचा असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तिथे ती रस्त्यावर पडलेला कचरा उचलताना दिसत आहे. अभिनेत्री मलायका जिममध्ये जात असताना तिचा गेटच्या बाहेर थोडा कचरा पडलेला दिसला. त्यानंतर तिने लगेचच तो कचरा एकत्र केला आणि हाताने उचलून गेटच्या आत निघून गेली. 

मलायकाचे हे स्वच्छता अभियान पॅपाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाले आहे. जिमच्या आत गेल्यानंतर मलायकाने हातातील कचरा तिथे असलेल्या गोणीवर ठेवून दिला. त्यानंतर पॅपाराझींना हाय बोलून ती निघून गेली. मात्र, मलायकाच्या या स्वच्छता अभियानाचे अनेकांनी कौतुक केले तर काहींनी मात्र ट्रोल केले आहे. मलायकाने फक्त कॅमेऱ्यासाठी असं केल्याचा आरोप नेटकरी करत आहेत. तर, काहींनी मात्र, तिला सपोर्ट करत तिचं कौतुकदेखील केलं आहे. 

अनेकांनी मलायकाच्या या व्हिडिओवर कमेंट करत म्हटलं आहे की, तिने हे फक्त कॅमेऱ्यासाठी केलं आहे. हा सगळा ड्रामा असल्याचं म्हणत नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे. एका युझर्सने लिहलं आहे की, रोल, कॅमेरा, अॅक्शन. तर, आणखी एका युझर्सने म्हटलं आहे की, तिला माहितीये कॅमेरा सुरू आहे. तर, काहींनी म्हटलं, कॅमेरा पाहून स्वच्छता करायला सुरुवात केली. युजर्सचं म्हणण आहे की, हे सर्व दिखाव्यासाठी आहे. मलायकाला ट्रोल करत एकाने म्हटलं आहे की, हे लोक घरातील कचऱ्याला हातदेखील लावत नाहीत आणि कॅमेऱ्यासमोर रस्त्यावरील कचरा उचलत आहेत.  

मलायकाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, अलीकडेच ती इंडियाज बेस्ट डान्सर या रिअॅलिटी शोमध्ये परीक्षकांच्या भूमिकेत दिसली होती. त्याचबरोबर,  मुलगा अरहान खानच्या पॉडकास्ट डंब बिर्याणीमध्येही ती दिसली होती. यानंतर मलायका करीना कपूर, करण जोहर आणि प्रतीक गांधी यांच्यासोबत स्टार Vs फूड या शोमध्ये दिसणार आहे