व्हिडिओ : 'हॅलो हॅलो'करत मलाईकाचं आणखी एक 'पटाखा' आयटम साँग!

कोरिओग्राफर गणेश आचार्य यांनी हे गाणं कोरिओग्राफ केलंय

Updated: Sep 6, 2018, 09:10 AM IST
व्हिडिओ : 'हॅलो हॅलो'करत मलाईकाचं आणखी एक 'पटाखा' आयटम साँग! title=

मुंबई : विशाल भारद्वाजच्या 'पटाखा' या सिनेमाचं नवं गाणं 'हॅलो हॅलो' प्रदर्शित करण्यात आलंय. या गाण्याच्या निमित्तानं बऱ्याच काळानंतर 'छैय्या छैय्या' गर्ल मलाईका पुन्हा एकदा आयटम साँगमध्ये थिरकताना दिसणार आहे. 'हॅलो हॅलो'मधली मलाईका पाहून तुम्हाला पुन्हा एकदा ट्रेनच्या छतावर शाहरुख खानसोबत नाचणारी मलाईका नक्कीच आठवेल.

मलाईकाचे याआधी छैय्या छैय्या, मुन्नी बदनाम हुई, अनारकली डिस्को चली हे आयटम साँग हीट ठरलेत. पहिल्यांदाच मलाईका मधुर आवाज रेखा भारद्वाज यांच्या आयटम नंबरवर नाचताना दिसणार आहे. 

या गाण्याचे बोल लिहिलेत गुलजार यांनी... कोरिओग्राफर गणेश आचार्य यांनी हे गाणं कोरिओग्राफ केलंय. 

'पटाखा' या सिनेमात एकमेकींना सतत भिडणाऱ्या दोन बहिणी दिसतात... 'दंगल गर्ल' सान्या मल्होत्रा आणि टीव्ही अभिनेत्री राधिका मदन बहिणींच्या भूमिकेत दिसणार आहेत. 'पटाखा'मध्ये कॉमेडियन - अभिनेता सुनील ग्रोवर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा 28 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.