मुंबई : अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) सोशल मीडियावर खूप ऍक्टिव असते. मलायका अनेकदा फोटो आणि व्हिडिओमुळे ट्रेंड होत असते. पुन्हा एकदा असाच एक व्हिडिओ मलायकाने शेअर केला आहे. (Malaika Arora get special gift from Ex Husband Arbaaz Khan) आणि याच व्हिडिओमुळे ती चर्चेत आली आहे. मलायकाचं हे गिफ्ट अतिशय खास असून सध्या याचीच चर्चा होताना दिसत आहे.
मलायकाने सांगितलं की, तिच्या एक्स हसबंडकडून म्हणजे अभिनेता अरबाज खानकडून तिला खास गिफ्ट आलं आहे. हे गिफ्ट म्हणजे एक बॉक्स आहे. या बॉक्सची चर्चा सुरू आहे. प्रत्येक स्त्रीला दागिना आवडतो तर अरबाजने मलायकाला काही दागिने गिफ्ट केलेत का? तर तसं अजिबात नाही. अरबाजने मलायकाला आंब्यांचा बॉक्स पाठवला आहे.
मलायकाने या आंब्यांच्या बॉक्सचा व्हिडिओ करत इंस्टा स्टोरीला शेअर केला आहे. 'या आंब्यांकरता आभार, अरबाज.. तुम्ही याला ऑनलाइन देखील ऑर्डर करू शकता.' असं म्हणतं तिने अरबाज खानला टॅग केलं आहे. सध्या आंब्यांचा सिझन आहे आणि मलायकाला तेच गिफ्ट म्हणून मिळालं आहे.
अरबाज आणि मलायका तब्बल 18 वर्षे एकत्र होते. त्यानंतर त्यांनी घटस्फोट घेतला आहे. अद्याप त्यांचं हे नातं तुटण्या मागचं कारण स्पष्ट झालेलं नाही. मात्र हे दोघं एकमेकांसोबत आनंदी नव्हते. घटस्फोटानंतर या दोघांनी वेगवेगळ्या माणसांत प्रेम पाहिलं. (या चोरीमुळे अखेर ''मुन्नी बदनाम'' होणार का? मुन्नी चोरी करुन गाडीत बसली पण फसली)
मलायका अर्जुन कपूरसोबत आनंदात आहे तर अरबाज खा हा जॉर्जियासोबत खूष आहे. हे दोघं आता आपल्या नव्या पार्टनरसोबतच स्पॉट होतात. अरबाज आणि जॉर्जिया जास्त चर्चेत नसतात. मात्र अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा कायमच लाइमलाइटमध्ये असतात. असं म्हटलं जातंय की दोघं लवकरच लग्न देखील करणार आहेत.
अनेकदा हे दोघं सिक्रेट व्हॅकेशनला देखील गेले आहेत. प्रेमाची कबुली या दोघांनी कधीच दिली आहे. लवकरच सात फेरे घेत लग्नबंधनात अडकू शकतात.