अर्जुन कपूरच्या प्री-बर्थडे पार्टीत मलायका गैरहजर! नातेवाईकांपासून मित्रमंडळींची मात्र गर्दी

Malaika Arora Absent In Arjun Kapoor Birthday Bash : मलायका अरोरानं अर्जुन कपूरच्या प्री-बर्थडे पार्टीत लावली नाही हजेरी... 

दिक्षा पाटील | Updated: Jun 26, 2024, 10:48 AM IST
अर्जुन कपूरच्या प्री-बर्थडे पार्टीत मलायका गैरहजर! नातेवाईकांपासून मित्रमंडळींची मात्र गर्दी title=
(Photo Credit : Social Media)

Malaika Arora Absent In Arjun Kapoor Birthday Bash : बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरचा आज 26 जून रोजी 39 वा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी त्याच्या घरी प्री-बर्थडे सेलिब्रेशन ठेवण्यात आलं होतं. ज्यात त्यानं कुटुंब आणि जवळच्या लोकांना आमंत्रण दिलं होतं. आता सेलिब्रेशननंतर पुन्हा एकदा मलायका अरोरा आणि अर्जुनच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगल्या आहेत. त्याचं कारण म्हणजे अर्जुनच्या वाढदिवसाला संपूर्ण बॉलिवूड पोहोचलं होतं पण जर कोणी दिसलं नसेल तर ती मलायका अरोरा आहे. 

मलायका या पार्टीत पोहोचली नाही त्यामुळे पापाराझींपासून त्या दोघांच्या चाहत्यांना देखील धक्का बसला आहे. या पार्टीत अर्जुनचे नातेवाईकांपासून बॉलिवूडमधील मित्रांनी हजेरी लावली होती. त्यामुळे मलायका का नाही आली हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी ते दोघं विभक्त झाल्याची बातमी समोर आली होती. तर मलायकाच्या मॅनेजरनं या अफवा असल्याचं म्हटलं होतं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

'इंडिया टुडे'ला दिलेल्या माहितीती त्यांनी सांगितलं की ते अजूनही सोबत आहेत आणि ब्रेकअपची बातमी ही फक्त अफवा आहे. तर 'पिंकव्हिला'नं दिलेल्या एका रिपोर्टमध्ये असे म्हटले होते की 'दोघांनी एकत्र येऊन शांतपणे विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. रिपोर्ट्सनुसार, मलायका आणि अर्जुनचं नातं खूप खास आहे आणि दोघं एकमेकांच्या आठवणीत नेहमीच राहतील. त्या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्या दोघांनी यावर कोणतंही वक्तव्य करण्यास नकार दिला आहे. त्यांना कोणालाही त्यांच्या नात्यावर बोलण्याची परवानगी दिलेली नाही.' 

दरम्यान, 2019 मध्ये मलायकानं पहिल्यांदा अर्जुन कपूरच्या वाढदिवसानिमित्तानं पोस्ट शेअर करत त्यांच्या प्रेमाची कबूली दिली होती. या पोस्टमध्ये अर्जुन कपूरसोबत गेलेल्या ट्रिपवरचा एक फोटो शेअर केला होता. ज्यात दोघे एकमेकांचा हात धरला आहे आणि त्यांच्यातील क्लोज बॉन्डिंग त्यात दिसते. यानंतर दोघांनी वाढदिवसापासून वॅलेन्टाईन डे किंवा मग इतर कोणताही खास दिवस असून एकमेकांसोबतच्या अनेक पोस्ट शेअर केल्या. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगल्या होत्या. 

अर्जुनच्या वाढदिवसाच्या पार्टीविषयी बोलायचे झाले तर कुटुंबातून सावत्र बहीण जान्हवी कपरू आणि चुलत बहीण शनाया कपूर. मोहित मारवा, काका संजय कपूर आणि काकू महीप कपूर यांनी हजेरी लावली होती. तर चित्रपटसृष्टीतून देखील अनेकांनी हजेरी लावली होती.