अर्जुनच्या बर्थ डे पार्टीत बेभान होऊन नाचली Malaika, इनसाईड Video समोर

Malaika Arora Dance at Arjun Kapoor's Birthday Party : मलायका अरोराचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूरच्या पार्टीतील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तिच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत तिला ट्रोल केलं आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Jun 26, 2023, 12:53 PM IST
अर्जुनच्या बर्थ डे पार्टीत बेभान होऊन नाचली Malaika, इनसाईड Video समोर title=
(Photo Credit : Instant Bollywood Instagram)

Malaika Arora Dance at Arjun Kapoor's Birthday Party : बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरचा आज 26 जून रोजी 38 वा वाढदिवस आहे. त्या निमित्तानं काल त्याच्या घरी प्री बर्थडे सेलिब्रेशन होतं. त्याच्या या प्री बर्थडे सेलिब्रेशनमध्ये त्याची बहीण अंशुला, खुशी कपूर आणि त्यांच्यासोबत त्याची गर्लफ्रेंड मलायका अरोरा देखील उपस्थित होती. आता अर्जुनच्या या पार्टीतील काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आले आहेत. त्यातील एका व्हिडीओत मलायका आनंदानं डान्स करताना दिसली. 

मलायकाचा डान्स करताना हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर इन्स्टंट बॉलिवूड या पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत मलायकानं पांढऱ्या रंगाचा बॉडी कॉन ड्रेस परिधान केल्याचे दिसतं आहे. तर या ड्रेसमध्ये मलायका खूप हॉट आणि सुंदर दिसत आहे. अशात व्हिडीओत मलायका तिच्याच लोकप्रिय असलेल्या 'छैय्या छैय्या' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या गाण्यावर डान्स करत असताना ती बेभाण झाल्याचे दिसत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

मलायकाच्या या व्हायरल झालेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध कमेंट केल्या आहेत. एक नेटकरी कमेंट करत मलायकाला ट्रोल करत म्हणाला, "त्यामुळेच प्रत्येक मुलाला भाभी आवडते." दुसरा नेटकरी म्हणाला, "असं वाटतंय की पार्टीत मलायकाला दारू चढली आहे." तिसरा म्हणाला, "50 वर्षांपासून मलायका त्याच गाण्यावर डान्स करते. त्यात मुन्नी बदनाम आणि छैय्या छैय्या आहे. कंटाळ येत नाही का हिला. तर त्यात आणखी अनेक नेटकऱ्यांनी मलायकाला ट्रोल केले आहे". काही नेटकऱ्यांनी मलायकाची बाजू घेतली आहे. एक नेटकरी म्हणाला, "लोक आनंदी असेल की इतरांना त्याचा त्रास का होतो. ती तिच्या आयुष्यात आनंदी आहे तर तुम्हाला तिला ट्रोल का करायचे आहे." 

हेही वाचा : Shah Rukh Khan ला बॉलिवूडमध्ये 31 वर्षे पूर्ण होताच 'तो' विचारतो, 'सिगरेट पिने चलोगे क्या?'

अंशुलानं देखील तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत अंशुला ही खुशी कपूरसोबत दिसत आहे. त्या दोघांसोबत दोन मुलं देखील आहे. त्यांचे हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 

Malaika Arora Dance at Arjun Kapoor s Birthday Party on chaiya chaiya song inside video viral

दरम्यान, अरबाज खानशी घटस्फोट दिल्यानंतर मलायका अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आली. अर्जुन आणि मलायका या दोघांनाही त्या दोघांमध्ये असलेल्या वयाच्या फरकामुळे ट्रोल करण्यात येते. त्या दोघांमध्ये 12 वर्षांचा फरक आहे. बऱ्याचवेळा अशा ट्रोलिंगकडे लक्ष देत नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. इतकंच नाही तर त्या दोघांच्या लग्नाच्या चर्चा या बऱ्याचवेळा होतात. मात्र, त्या दोघांनी किंवा त्यांच्या कुटुंबानं या बातमीवर दुजोरा दिलेला नाही.