पिवळ्या ड्रेसमध्ये दिसणारी ही क्यूट मुलगी कोण आहे ओळखली का? आज आहे बॉलीवूडची टॉप अभिनेत्री

ती 48 वर्षांची झाली तरीही आज ही अभिनेत्री तिच्या बोल्ड लूक आणि स्टाईलने लोकांच्या हृदयात कायमस्वरूपी स्थान निर्माण करते आहे. ही सुंदरी अनेक हिट गाण्यांमध्ये डान्स करतानाही दिसली आहे आणि तिच्या कामासोबतच ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आहे. ती कोण आहे तुम्हाला ओळखता आली आहे का? या वर्णनावरून तुमच्या लक्षात आलं असेलच की ही अभिनेत्री कोण ते. 

Updated: Oct 23, 2022, 08:24 PM IST
पिवळ्या ड्रेसमध्ये दिसणारी ही क्यूट मुलगी कोण आहे ओळखली का? आज आहे बॉलीवूडची टॉप अभिनेत्री  title=

Malaika Arora Childhood Photos: सध्या अनेक सेलिब्रेटींचे लहाणपणीचे फोटो नेहमीच व्हायरल (Celebrity Childhood Photos) होत असतात. त्यांचे फोटो पाहून अनेक त्यांच्या चाहत्यांना आपलं बालपण आठवतं. आपल्या आवडत्या सेलिब्रेटींचे फोटो पाहायला त्यांच्या चाहत्यांना नेहमीच आवडतात. सध्या असाच एक फोटो व्हायरल होतो आहे. या फोटोत दोन लहान क्यूट मुली दिसत आहे. त्या एकत्र एके ठिकाणी बसल्या आहेत. डावीकडे पिवळ्या पोशाखातली गोंडस मुलगी आजची खूप मोठी आणि लोकप्रिय अभिनेत्री आणि नृत्यांगना (Bollywood Actresses) आहे. (Malaika Arora childhood photos in yellow dress viral pic entertainment news marathi)

ती 48 वर्षांची झाली तरीही आज ही अभिनेत्री तिच्या बोल्ड लूक आणि स्टाईलने लोकांच्या हृदयात कायमस्वरूपी स्थान निर्माण करते आहे. ही सुंदरी अनेक हिट गाण्यांमध्ये डान्स करतानाही दिसली आहे आणि तिच्या कामासोबतच ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आहे. ती कोण आहे तुम्हाला ओळखता आली आहे का? या वर्णनावरून तुमच्या लक्षात आलं असेलच की ही अभिनेत्री कोण ते. 

हेही वाचा - तो किस्सा सांगताना अभिनेता सिद्धार्थ जाधवच्या डोळ्यात आलं पाणी, आवंढा गिळत म्हणाला...

आज ही अभिनेत्री आपल्या सौंदर्याने लोकांना वेड लावते आहे. ती आहे बोल्ड आणि ब्यूटीफूल अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora Childhood Photos). मलायका कधी तिच्या बोल्ड ड्रेसिंग सेन्ससाठी तर कधी तिच्या जिम लूकसाठी ओळखली जाते. मलायकाचा एकदा घटस्फोट (Malaika Arora Divorce) झाला असून आता तिला आयुष्यात दुसऱ्यांदा प्रेम मिळाले आहे. आज म्हणजेच 23 ऑक्टोबरला या अभिनेत्रीचा वाढदिवस आहे.

 
 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पिवळ्या ड्रेसमध्ये या अतिशय गोंडस मुलीचे नाव मलायका आहे जर तुम्हाला आत्तापर्यंत अंदाज आला नसेल तर फोटोमध्ये पिवळा ड्रेस घातलेली मुलगी दुसरी कोणी नसून अभिनेत्री मलायका अरोरा आहे. मलायका अरोराचा हा दुर्मिळ बालपणीचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. मलायका ही अरबाज खानची (Arbaaz Khan) पत्नी होती पण आता घटस्फोटानंतर मलायका अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे.

 

हेही वाचा - 'मी कोणाला पैसे...', लोकप्रिय अभिनेत्रीनं आपल्या बॉलिवूड एन्ट्रीबद्दल केला धक्कादायक खुलासा

आज मलायका देखील तिचा वाढदिवस साजरा करत आहे आणि तिचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूरला (Malaika Arora Birthday) शुभेच्छा देण्यासाठी खूप रोमँटिक कॅप्शनसह एक हॉट फोटो पोस्ट केला आहे.