मलायका अरोरा अर्जून कपूरला लग्नासाठी नाहीतर 'या' गोष्टीसाठी म्हणाली 'हो' ; अखेर सत्य समोर

मलायका अरोराने इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचा एक फोटो शेअर केला आहे 

Updated: Nov 10, 2022, 05:24 PM IST
मलायका अरोरा अर्जून कपूरला लग्नासाठी नाहीतर 'या' गोष्टीसाठी म्हणाली 'हो' ; अखेर सत्य समोर title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि त्याची गर्लफ्रेंड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) यांची जोडी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. हे दोघं सोशल मीडियावर सक्रिय असल्याचं दिसतं. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. अभिनेत्री तिच्यापेक्षा 12 वर्षांनी लहान असलेल्या अभिनेता अर्जुन कपूरला बऱ्याच दिवसांपासून डेट करत आहे. त्यांचं नातं कोणापासून लपलेलं नाही. काही दिवसांपासून मलायका आणि अर्जुन लग्न करणार असल्याच्या चर्चा होत्या. एवढंच नाही तर मलायकाच्या पोस्टवर शिक्कामोर्तब करण्याचं कामही केलं. 

मलायका अरोराने इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचा एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये ती लाजत आहे. काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये ती नेहमीसारखीच सुंदर दिसत आहे. फोटोपेक्षा तिच्या कॅप्शनने लोकांचं लक्ष वेधून घेतलं. तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, "I Said Yes." अभिनेत्रीच्या पोस्टवरून लोकांना वाटलं की, अभिनेत्रीने अर्जुन कपूरला लग्नासाठी हो म्हटलं आहे. मग काय, सेलेब्सपासून चाहत्यांपर्यंत सगळेच तिचं अभिनंदन करू लागले. मात्र, प्रत्यक्षात तसं काही नाहीये. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अर्जुन-मलायकाचं लग्न होणार नाही?
आता अखेर मलायका अरोराने सर्व अफवा फेटाळून लावल्या आहेत. शेअर केलेल्या पोस्ट मागचं खरं कारणही सांगितलं आहे. तिने अर्जुन कपूरला लग्नासाठी 'हो' म्हटलम नाही, तर डिस्ने प्लस हॉटस्टारवर येणाऱ्या तिच्या रिएलिटी शोसाठी ती हो म्हणाली आहे. मलायका अरोराचा रिअॅलिटी शो 'मुव्हिंग विथ मलायका' OTT वर प्रसारित होणार आहे. हा शो 5 डिसेंबर 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हे आहे लग्नाच्या बातम्यां मागचं सत्य
पोस्ट शेअर करताना मलायका अरोराने कॅप्शनमध्ये लिहिले की, “मी माझ्या नवीन रिअॅलिटी शो 'मूव्हिंग विथ मलायका'साठी डिस्ने+ हॉटस्टारला हो म्हटलं आहे. येथे तुम्ही माझ्याबद्दल जवळून आणि वैयक्तिकरित्या जाणून घेऊ शकाल, जे तुम्हाला आधी माहित नसेल. थांबा, मी कशाबद्दल बोलत होते असे तुम्हाला वाटतं? 5 डिसेंबरपासून प्रवाहित होईल." सध्या तरी अभिनेत्रीने तिच्या लग्नाच्या बातम्या फेटाळून लावल्या आहेत. आता या पावर कपलच्या लग्नासाठी चाहत्यांना अजून थोडी वाट पाहावी लागणार आहे.