मुंबई : सुपरस्टार यशचा चित्रपट KGF Chapter 2 ने जगभरात एक हजार कोटींहून अधिक कमाई केली आहे. हा चित्रपट अनेक भाषांमध्ये प्रदर्शित झाला आणि लोकप्रिय झाला. हिंदी भाषेतच या चित्रपटाने 400 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे. या चित्रपटाचा परिणाम असा झाला की अनेक मोठे बॉलिवूड चित्रपटही बॉक्स ऑफिसवर मागे पडले आणि निर्मात्यांना मोठा झटका बसला. चित्रपटातील दोन्ही भाग लोकांना खूप आवडले आहेत. अशा स्थितीत त्याच्या तिसऱ्या भागाचीही चर्चा रंगताना दिसत आहे.
अलीकडील मीडिया रिपोर्ट्समध्ये, KGF निर्माते विजय किरागांडूर यांनी दावा केला होता की 'KGF 3' या ऑक्टोबरमध्ये फ्लोअरवर जाईल आणि 2024 मध्ये रिलीज करण्याची योजना आहे. मात्र, आता हे वृत्त होमबेल फिल्म्सने फेटाळून लावलं आहे. होमबेल फिल्म्सचे कार्यकारी निर्माते कार्तिक गौडा यांनी सर्व अंदाज खोडून काढले आहेत आणि अधिकृत घोषणेसह चित्रपटावर काम सुरू करणार असल्याचं सांगितलं आहे.
कार्तिक गौडा यांनी शनिवारी ट्विट केलं, "ज्या बातम्या आजूबाजूला येत आहेत त्या सगळ्या कल्पना आहेत. आमच्या पुढे अनेक प्रोजेक्ट असताना, आम्ही होम बेल फिल्म्स अद्याप KGF 3 सुरू करणार नाही. आम्ही त्यावर काम सुरू केल्यावर आम्ही तुम्हाला कळवू." कार्तिकच्या या ट्विटवरून हे स्पष्ट झालं आहे की KGF च्या चाहत्यांना या चित्रपटाच्या तिसऱ्या भागासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. 'KGF 2' गेल्या महिन्यात 14 तारखेला थिएटरमध्ये रिलीज झाला होता. हिंदी भाषेत या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत आधीचे अनेक विक्रम मोडलं.