परीचा डान्स पाहून तुम्हीही तिच्या प्रेमात पडाल, पाहा व्हिडीओ

कच्चा बदामवर छोट्या परीचा धमाकेदार डान्स, व्हिडीओ पाहून म्हणाल 'सो क्युट'! 

Updated: Feb 17, 2022, 08:40 PM IST
परीचा डान्स पाहून तुम्हीही तिच्या प्रेमात पडाल, पाहा व्हिडीओ title=

मुंबई : कच्चा बदाम गाण्याने जगाला वेड लावलं आहे. या गाण्यावर सोशल मीडियावर तुफान रिल्स सध्या होत आहेत. हा ट्रेन्डिंगचा विषय ठरला आहे. अगदी सेलिब्रिटींपासून ते प्रत्येक सणसमारंभात ह्या गाण्यावर रिल्स तयार होत आहेत. आता माझी तुझी रेशीम गाठ सीरियलमधील गोंडस परीला देखील या गाण्यावर डान्स करण्याचा मोह आवरला नाही. 

चिमुकली परी म्हणजेच मायरा सध्या आपल्या हटके भूमिकेमुळे सर्वांची लाडकी आणि चर्चेचा विषय ठरली आहे. तिच्या कौशल्याची आणि अभिनयाची तर तोडच नाही. सध्या तिचे फोटो आणि व्हिडीओ देखील तुफान चर्चेत आहेत. 

मायराने कच्चा बदाम गाण्यावर डान्स केला आहे. यावेळी तिने हिरव्या रंगाचा खूप सुंदर ड्रेस घातला आहे. या ड्रेसमध्ये परी खूप सुंदर दिसत आहे. परी म्हणजेच मायरा वेगवेगळ्या गाण्यांवर व्हिडीओ करते. तिचे हावभाव प्रत्येक व्हिडीओमध्ये खूप सुंदर आहेत.

मायरा तिच्या अभिनयासाठी खूप प्रसिद्ध आहे. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत ती परीची भूमिका करत आहे. तिच्या नावानं इन्स्टाग्रामवर खास अकाऊंट तयार करण्यात आलं आहे. यावर तिचे रिल्स किंवा तिचे सुंदर फोटो शेअर करण्यात आले आहेत.