मुंबई : नुकताच 'झी चित्र गौरव' पुरस्कार २०२४ हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या वर्षीचा झी चित्र गौरव पुरस्कार सोहळा हा खूप गाजणार आहे कारण बॉक्स ऑफिसवर हे वर्ष खऱ्या अर्थाने महिलांनी गाजवले मग तो 'बाईपण भारी देवा' सारखा चित्रपट असू दे किंवा मग 'झिम्मा २'. या पुरस्कार सोहळ्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे 'जीवनगौरव पुरस्कार', ह्यावर्षी या जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी ठरल्या त्या 'उषाताई मंगेशकर'. तर ह्यावर्षीच्या 'मराठी पाऊल पडते पुढे' पुरस्काराची मानकरी ठरली ती म्हणजे 'प्रिया बापट'. तसेच ह्या सोहळ्यात हिंदी चित्रपटसृष्टीतल्या दोन अशा अभिनेत्रींनी उपस्थिती लावली ज्यांनी आपल्या नृत्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. त्या अभिनेत्री म्हणजे 'शिल्पा शेट्टी' आणि दुसरी म्हणजे 'सारा अली खान'. मात्र असं असलं तरी या कार्यक्रमातील सगळ्यात लक्षवेधी ठरलेली गोष्ट म्हणजे अजित पवार यांची मुलाखत.
मराठी चित्रपटसृष्टी ज्याची आतुरतेने वाट पाहत असते असा प्रतिष्ठित 'झी गौरव पुरस्कार २०२४' हा सोहळा मोठ्या दिमाखदार आणि धमाकेदार पद्धतीने साजरा झाला, यावर्षीच्या 'झी चित्रगौरव पुरस्कार २०२४' सोहळ्याचे खास आकर्षण म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार साहेब. ह्या पुरस्कार सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित दादा अवधूत गुप्तेंनी विचारलेल्या प्रश्नांना सामोरे गेले आणि अतिशय खुमासदारपणे आणि मनोरंजकपणे त्यांचा सर्व प्रश्नांची उत्तरं दिली.
या कार्यक्रमात अजित दादांनी त्यांच्या काही जुन्या आठवणी ही ताज्या केल्या 'मी जास्त चित्रपट पाहत नाही. पण कॉलजच्या काळात मला अमिताभ बच्चन आवडायचे, नंतरच्या काळात शाहरुख खान आला, त्यामुळे वयानुसार आवड असते, असंही अजित पवार म्हणाले. जर तुमच्यावर बायोपिक करायचा म्हटलं तर कोणी अभिनय करावा? असा प्रश्न विचारल्यावर अजितदादांनी डॉक्टर निलेश साबळे यांचं नाव घेतंल. त्यावेळी साबळेंनी अजितदादांची मिमिक्री देखील करून दाखवली.
कार्यक्रमात एक गेम खेळत असताना अवधुत गुप्ते यांनी 'थंड बर्फ कोणाला द्यावा? जेणेकरून डोक्यावर ठेऊन डोकं शांत केलं जाईल', असा सवाल विचारला तेव्हा दादांनी पार्थ पवार यांच नाव घेतलं. अजून काय काय म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार. यासाठी पाहायला विसरू नका 'झी चित्र गौरव पुरस्कार २०२४' शनिवार १६ मार्च संध्या. ७ वा. झी मराठीवर.