First Look : कलंकमध्ये माधुरीचा असा लूक

21 वर्षांनी संजय - माधुरी एकत्र 

First Look : कलंकमध्ये माधुरीचा असा लूक  title=

मुंबई : करण जोहरचा आगामी सिनेमा 'कलंक' मधील माधुरी दीक्षितचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. माधुरी या फोटोमध्ये ब्लॅक आऊटफिटमध्ये दिसत आहे. माधुरीने कानांत मोठे झुमके घातले आहेत. सुट्या केसांमध्ये माधुरी अगदी सुंदर दिसत आहे. मेगा स्टारर असलेल्या या सिनेमांत माधुरी दीक्षितसोबत सोनाक्षी सिन्हा, आलिया भट्ट, वरूण धवन, आदित्य रॉय कपूर आणि संजय दत्त असणार आहे. 

सिनेमाचं पोस्टर रिलिज होत आहे. जवळपास 21 वर्षांनी संजय दत्त आणि माधुरी दीक्षित एकत्र दिसणार आहे. संजय दत्त आणि माधुरीचं अफेअर असल्याची चर्चा अनेकदा रंगली आहे. या अगोदर साजन, खलनायक आणि थानेदार सारख्या सिनेमांत हे दोघे एकत्र आले होते. साजन या सिनेमांत  दोघांच काम लोकांनी खूप उचलून धरलं होतं. त्यामुळे आता 21 वर्षांनी ही आवडती जोडी. 

कलंक या सिनेमांत संजय - माधुरीप्रमाणेच वरूण धवन आणि आलिया भट्ट ही जोडी देखील रोमान्स करताना दिसणार आहे. या सिनेमाची रिलीज डेट ही 19 एप्रिल 2019 असल्याचं सांगण्यात येत आहे.