Madhuri Dixit : माधुरी दीक्षितवर कोसळला दु:खाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीचं निधन

Madhuri Dixit : बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तिच्या सर्वात जवळच्या व्यक्तीचं निधन झालं आहे. 

Updated: Mar 12, 2023, 12:41 PM IST
Madhuri Dixit : माधुरी दीक्षितवर कोसळला दु:खाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीचं निधन title=
Madhuri Dixit Mother snehlata dixit Passed Away and funeral in worli mumbai

Madhuri Dixit Mother Passed Away : अभिनेत्री माधुरी दीक्षित नेनेला मातृशोक... माधुरीच्या आई स्नेहलता दीक्षित यांचं आज सकाळी 8.40 वाजता निधन झालं आहे. त्यांच्या पार्थिवावर दुपारी 3.40 च्या दरम्यान मुंबईतील वरळी इथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनानं माधुरी आणि त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

91 वर्षांच्या स्नेहलता दीक्षित यांच्या मृत्यूचं कारण अद्याप माध्यमांसमोर आलेले नाही. माधुरी दीक्षित आणि त्यांचं पती श्रीराम नेने यांनी संयुक्त निवेदनात ही दुःखद बातमी शेअर केली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene)

गेल्या वर्षी जून महिन्यात स्नेहलता दीक्षित यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता.  माधुरीसाठी तिची आई एक जिवलग मैत्रिण होती. त्यावेळी माधुरीने इंस्टाग्राम सुंदर नोट लिहिली होती. 

आईसोबत माधुरीने गायलं गाणं

 'गुलाब गँग' 2013 मध्ये आलेल्या चित्रपटातील हा किस्सा आहे. अनुभव सिन्हा या चित्रपट निर्मात्याने याबद्दल सांगितलं आहे.''जेव्हा आम्ही चित्रपटातील गाणे गाण्यासाठी माधुरीशी संपर्क साधला तेव्हा तिने आनंदाने होकार दिला. माधुरी दीक्षित जेव्हा रेकॉर्डिंगसाठी आली तेव्हा त्यांची आई सोबत होती. त्यावेळी आम्हाला कळलं की, त्या खूप चांगल्या गायिका आहे. म्हणून आम्ही माधुरीच्या आईला विचारलं की त्या गाणं गाऊ शकतं का?. अखेरीस, आम्ही माधुरी आणि तिची आई दोघांनाही चित्रपटात गाणं गायला लावलं.