'डान्स दिवाने'च्या मंचावर माधुरी-भारती यांना कोणी रडवलं?

स्मॉल स्क्रिनवरील लोकप्रिय डान्सिंग रिअॅलिटी शो डान्स दिवाने लोकांना आवडत आहे. या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

Updated: Aug 19, 2021, 10:26 AM IST
 'डान्स दिवाने'च्या मंचावर माधुरी-भारती यांना कोणी रडवलं? title=

मुंबई : स्मॉल स्क्रिनवरील लोकप्रिय डान्सिंग रिअॅलिटी शो डान्स दिवाने लोकांना आवडत आहे. या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. प्रत्येक आठवड्यात स्पर्धक शोमध्ये त्यांची उत्कृष्ट कामगिरी दाखवताना दिसतात. शोमध्ये 3 वेगवेगळ्या पिढीचे स्पर्धक आहेत आणि सर्व एकापेक्षा एक परफॉर्मन्स देत आहेत. त्याचबरोबर या आठवड्यात एक परफॉर्मन्स पाहून माधुरी दीक्षित खूप भावूक झाली आहे.

खरं तर, या आठवड्यात शो मध्ये, स्पर्धक प्रेमाचे अनेक रंग पसरवून हटके अंदाजातील परफॉर्मन्स सादर करतील. स्पर्धक सद्दाम शेख आणि रूपेश सोनी यांचा परफॉर्मन्स प्रत्येकाच्या हृदयाला इतका स्पर्श करेल की शोचे जज माधुरी दीक्षित आणि तुषार कालिया खूप भावूक होताना दिसतील. माधुरी आणि तुषार नृत्य पाहून इतके भावुक होतात की त्यांच्या डोळ्यातून अश्रू येतात.

भारतीला ही रडू कोसळलं

त्याचवेळी, शोची होस्ट, भारती सिंह, जी सर्वांना हसवते, ती हा डान्स अॅक्ट पाहून खूप भावूक झाली आणि तिलाही अश्रू रोखता आले नाहीत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ColorsTV (@colorstv)

कलर्सने प्रोमो व्हिडिओसह एक विशेष कॅप्शन देखील लिहिले - "प्रेमाला कोणतेही स्वरूप नसते आणि अशा हृदयस्पर्शी कामगिरीसाठी शब्द नाहीत." शोचा प्रोमो व्हिडीओ पाहून असे म्हणता येईल की डान्स दिवानेच्या या आठवड्यातील एपिसोड खूप भावनिक असणार आहे आणि थीमनुसार प्रेमाचे अनेक रंग पाहायला मिळणार आहेत.