धनुष पुन्हा पडद्यावर झळकणार, मारी 2 चा ट्रेलर व्हायरल

 अॅक्शन सिनेमा मारी 2 चा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला आहे.  चित्रपटात धनुष एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. एका भयानक अवतारात तो प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.  एका अनोख्या अंदाजात धनुष पडद्यावर यावेळी दिसणार आहे. 

Updated: Dec 5, 2018, 09:18 PM IST
धनुष पुन्हा पडद्यावर झळकणार, मारी 2 चा ट्रेलर व्हायरल  title=

मुंबई : अॅक्शन सिनेमा मारी 2 चा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला आहे.  चित्रपटात धनुष एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. एका भयानक अवतारात तो प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. धनुषच्या मारी 2 चित्रपटाने यूट्यूबवर धमाल केली आहे. मारी 2 हा तमिळ चित्रपटाचा सिक्वेल आहे. मारी बॉक्स ऑफिसवर सुपरहिट होता यातही विशेष म्हणजे, धनुष स्वत:च्या चित्रपटचा ट्रेलर अशावेळी रिलीज करतोय, जेव्हा रजनीकांतचा चित्रपट “0.2 बॉक्स ऑफिसवर हीट होतोय.  रजनीकांतच्या चित्रपटात ग्राफिक्स असल्यानं प्रेक्षकांना 0.2 चित्रपट खूप जास्त आवडला. एका अनोख्या अंदाजात धनुष पडद्यावर यावेळी दिसणार आहे. 
 
धनुषचा सिनेमा 'मारी 2” हा 21 डिसेंबरला रिलीज होणार आहे. धनुषच्या तमिळ चित्रपटाचं म्युझिक युवान शंकर राजाने दिले आहे. “मारी 2” मध्ये साई पल्लवी आणि तोविनो थॉमस लीड रोलमध्ये आहेत. तोविया थॉमसने या चित्रपटात भयानक विलेनचा रोल केला आहे. 

चित्रपटाचं शुटिंग ऑगस्ट 2018 मध्ये झाली आहे. “मारी 2“ या चित्रपटाचं दिग्दर्शन बालाजी मोहन यांनी केलं आहे.  धनुष स्वत: प्रोडयूसर आहे. धनुषचा मारी चित्रपट हा 2015 रिलीज झाला होता. हा चित्रपट प्रेक्षकांना इतका काही आकर्षित नाही करू शकला.

“मारी” मध्ये धनुष सोबत काजल अग्रवाल लीड रोलमध्ये होती. मारीच्या डब वर्जनमध्ये प्रेक्षकांना भारी आवडला होता.  यातले अॅक्शन-सॉन्ग तर सुपरहिट होते. आता सर्वांचं लक्ष हे साई पल्लवी आणि धनुषच्या जोडीवर आहे. शिवाय तोविनो खूप भयानक रोलमध्ये आहे. त्याचबरोबर धनुष हा जुन्या नॉटी डॉन कॅरेक्टरमध्ये आहे.