मुंबई : अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री कृती सेनन स्टारर 'लुका छुपी' सिनेमाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. 'लुका छुपी' कार्तिक आर्यनचा आतापर्यंतची सर्वाधिक ओपनिंग करणारा चित्रपट ठरला आहे. पण सिनेमा १०० कोटींच्या घरात पोहोचण्याची शक्यता कमी असल्याचे दिसत आहे. सिनेमाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिस दमदार कामगिरी केली होती. ट्रेड अॅनलिस्ट तरण आदर्श यांनी ट्विटरच्या माध्यमातून सिनेमाच्या कमाईचा आकडा जाहीर केला आहे. सिनेमाने आतापर्यंत ७५ कोटींचा गल्ला जमवल्याचे दिसत आहे.
#LukaChuppi has struck a chord with the youth... Biz on [second] Sat witnesses super growth... Crosses ₹ 60 cr... Eyes ₹ 75 cr... [Week 2] Fri 3.15 cr, Sat 5.20 cr. Total: ₹ 62.05 cr. India biz.
— taran adarsh (@taran_adarsh) March 10, 2019
सिनेमा जास्तीत जास्त १०० कोटींपर्यंत मजल मारण्या शक्यता वर्तवली जात आहे. कारण नुकताच 'कॅप्टन मार्वल' सिनेमा सिनेमागृहात झाला आहे आणि मुख्य म्हणजे 'पिंक' सिनेमानंतर अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नू यांचा 'बदला' सिनेमा सिनेमागृहात दाखल झाल्यामुळे या तिन सिनेमांमध्ये कमालीची टक्कर दिसत आहे.
'लुका छुपी' चित्रपटानंतर आता बॉलिवू़ड अभिनेता कार्तिक आर्यन इम्तियाज अलीसोबत 'लव आज कल' चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये काम करणार असल्याची चर्चा आहे. 'लव आज कल' चित्रपट १० वर्ष आधी प्रदर्शित झाला असून चित्रपटात सैफ अली खान आणि दीपिका पदुकोण यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या.