मिशिवाला बाबा म्हणतोय, 'विडिओ पाठवा'...

विडिओ पाठवा' म्हणणारा हा मिशिवाला आहे तरी कोण??

Updated: Jun 20, 2020, 10:33 AM IST
मिशिवाला बाबा म्हणतोय, 'विडिओ पाठवा'... title=

मुंबई : ''लाव रे तो विडिओ' या नावाचा, एक नवाकोरा, जबरदस्त कार्यक्रम, लवकरच 'झी युवा' वाहिनीवर सुरू होणार आहे. या नव्या कार्यक्रमाचा प्रोमो सध्या 'झी युवा'वर पाहायला मिळत आहे. प्रोमो बघून सगळ्यांची उत्सुकता अधिक वाढली असल्याचे दिसते आहे. खरंतर, ही वाहिनी सगळ्यांचीच लाडकी वाहिनी आहे. वेगवेगळ्या धाटणीच्या मालिका, भरपूर मनोरंजन करणारे कथाबाह्य कार्यक्रम, यांची रेलचेल या वाहिनीवर नेहमी पाहायला मिळते. लॉकडाऊनच्या काळात, घरी बसून आपण कंटाळलो आहोत, आणि त्याचवेळी, हा एक अफलातून शो आपल्या भेटीला येणार आहे.

नेहमीप्रमाणे, काहीतरी वेगळं पाहण्याची संधी यानिमित्ताने मिळणार आहे. खरंतर डॉ. निलेश साबळे यांची उपस्थिती, हा सुपरहिट फॉर्म्युला या कार्यक्रमात आहे. याशिवाय प्रोमोमध्ये दिसत असलेले 'पात्र' पाहून, हा कार्यक्रम हसून हसून लोटपोट करणार, याची खात्री होताना दिसते आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी आपल्याला सगळ्यांनाच मिळू शकत असल्याने, त्याकरिता सुद्धा अनेकजण उत्सुक आहेत.

तुमच्यात असेल जर मनोरंजनाचा कीडा तर पाठवा तुमचे व्हिडिओ झी युवाला... #ZeeYuva #LavReToVideo Mail I'D: talenthunting4zeeyuva@gmail.com Whatsapp no: 9011517825 *व्हिडिओवर अन्य कुठलाही लोगो नसावा.

Posted by Zee Yuva on Saturday, June 13, 2020

'लाव रे तो विडिओ' या कार्यक्रमाच्या प्रोमोमध्ये डोळ्यावर गॉगल आणि चेहऱ्यावर बहारदार मिशा असलेला एक माणूस दिसतोय. माईकसमोर बसून, तो 'विडिओ पाठवा', 'विडिओ पाठवा' एवढंच बोलतोय. हा मिशिवाला बाबा नक्की आहे तरी कोण, याविषयीची उत्सुकता सुद्धा मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली आहे. तो सतत मागत असलेला विडिओ नेमका कोणता, आणि तो कुणी पाठवायचा, याची चर्चा सुद्धा आता सुरू झाली आहे. 'विडिओ पाठवा' सांगणारा हा मिशिवाला बाबा कोण आहे, हे मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे.

झुपकेदार मिश्या असणाऱ्या या व्यक्तीबद्दल कधी माहिती मिळणार, याची वाट सगळी मंडळी बघत आहेत. या मिशीवाल्याचं ऐकून, एखादा विडिओ बनवण्याची तयारी सगळ्यांनीच केलेली आहे. एकंदरच, 'लाव रे तो विडिओ' या कार्यक्रमाची उत्सुकता, त्याच्या प्रोमोमधूनच दिसून येत आहे. लवकरच तुमच्या भेटीला येत असलेला हा आगळावेगळा कार्यक्रम, तुमच्या लाडक्या 'झी युवा' वाहिनीवर पाहायला विसरू नका.