'मला याची...', Kissing Scene देण्याविषयी 'हे' काय बोलून गेला Lalit Prabhakar

Lalit Prabhakar नं नुकत्याच दिलेल्या मुलाखतात Kissing Scene देण्यावर वक्तव्य केलं आहे. त्यानं दिलेल्या या वक्तव्यानंतर सगळीकडे एकच चर्चा सुरु झाली आहे. 

Updated: Feb 9, 2023, 01:55 PM IST
'मला याची...', Kissing Scene देण्याविषयी 'हे' काय बोलून गेला Lalit Prabhakar  title=

Lalit Prabhakar On Kissing Scene : मराठमोळा अभिनेता ललित प्रभाकर (Lalit Prabhakar) हा लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. ललित प्रभाकरचे लाखो चाहते आहेत. ललित प्रभाकर हा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तो चाहत्यांच्या संपर्कात राहतो. लवकरच ललित हा 'टर्री' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये ललित व्यस्त आहे. या चित्रपटातील एक गाणं प्रदर्शित झालं आहे. या गाण्यात ललितसोबत अभिनेत्री गौरी नलावडेचा रोमान्स पाहायला मिळत आहे. या गाण्यात ललित आणि गौरीचे किसिंग सीन देखील आहे. त्यावर ललितनं नुकत्याच दिलेल्या एका भाष्य केलं आहे. (Lalit Prabhakar Kissing Scene) 

ललितनं ही मुलाखत ‘कलाकृती मीडिया’ या युट्यूब चॅनेलला दिली होती. त्यावेळी ललितला चित्रपटातील किसींग सीनविषयी विचारण्याच आले होते. यावर ललितनं मजेशीर उत्तर दिले. 'मला याची सवय आहे', असं ललित म्हणाला. त्यानंतर किसींग सीनविषयी बोलताना ललित म्हणाला, 'चित्रपटात त्या दोन्ही भूमिकांचा पहिला किसींग सीन दाखवण्यात आला आहे.' किसिंग सीन देण्यामागे कोणत्या गोष्टी असतात हे सांगत ललित पुढे म्हणाला, 'फक्त स्क्रीनसमोर आलं आणि किसिंग सीन दिला असं होत नाही. चित्रपटातील किसिंग सीन जेव्हा प्रेक्षक पाहतील तेव्हा त्यांना ते छान वाटलं पाहिजे नाकी त्यांच्या अंगावर येणारे.' 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दरम्यान, ललित आणि गौरी यांच्यातील किसिंग सीन हा चित्रपटातील ‘क्षण हळवा’ या गाण्यात दाखवण्यात आला. चित्रपटातलं हे पहिलं गाणं प्रदर्शित झालं आहे. दरम्यान, ललितचा हा चित्रपट 17 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात ललितची एक वेगळी भूमिका पाहायला मिळणार आहे. 

हेही वाचा : Rahul Roy Birthday : आईसोबत अफेअरच्या अफवा; 'आशिकी' फेम राहुल रॉय 'या' अभिनेत्रींसोबत होता रिलेशनशिपमध्ये

दरम्यान, ललितच्या करिअरविषयी बोलायचे झाले तर त्यानं नाटक आणि मालिकांमध्येही काम केले आहे. छोट्या पडद्यावरील ‘जुळून येती रेशीमगाठी’ (Julun Yeti Reshimgathi) या मालिकेतून तो घरा-घरात पोहोचला. या मालिकेत ललित अभिनेत्री प्राजक्ता माळीसोबत (Prajakta Mali) दिसली होता. त्या दोघांची जोडी या मालिकेतून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. दरम्यान, या मालिकेनंतर ललित अनेक चित्रपटांमध्ये दिसला. ललित 'आनंदी गोपाळ' (Anandi Gopal) , 'झोंबिवली' (Zombivli), 'मीडियम स्पायसी' (Medium Spicy) या चित्रपटांमध्ये दिसला.आता त्याचा 'टर्री' (Tarri) हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत