'लक्ष्य' फेम अभिनेता अडकला लग्नाच्या बेडीत!

सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सगळीकडे आता लगीन घाई सुरु आहे. कधी आपल्या ओळखीच्या कोणत्या व्यक्तीचं लग्न होतय तर कधी आपला आवडता सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकत आहे. काही दिवसांपूर्वीच आपल्या सगळ्यांची लाडकी आणि हास्यजत्रा फेम वनिता खरात लग्न बंधनात अडकली होती. त्यानंतर आता 'लक्ष्य' फेम अभिनेता अभिजीत श्वेतचंद्र (Abhijeet Shwetchandra) हा लग्न बंधनात अडकला आहे. अभिजीत हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

Updated: Feb 25, 2023, 05:38 PM IST
'लक्ष्य' फेम अभिनेता अडकला लग्नाच्या बेडीत! title=

Abhijeet Shwetchandra Marriage : सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सगळीकडे आता लगीन घाई सुरु आहे. कधी आपल्या ओळखीच्या कोणत्या व्यक्तीचं लग्न होतय तर कधी आपला आवडता सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकत आहे. काही दिवसांपूर्वीच आपल्या सगळ्यांची लाडकी आणि हास्यजत्रा फेम वनिता खरात लग्न बंधनात अडकली होती. त्यानंतर आता 'लक्ष्य' फेम अभिनेता अभिजीत श्वेतचंद्र (Abhijeet Shwetchandra) हा लग्न बंधनात अडकला आहे. अभिजीत हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

अभिजीत श्वेतचंद्रनं अभिनेत्री आणि सेजल वर्देसोबत (Sejal Warde) सप्तपदी घेतल्या आहेत. सेजलसोबत लग्न करत अभिजीतनं त्याच्या नवीन आयुष्याला सुरुवात केली आहे. काल म्हणजेच 24 फेब्रुवारी रोजी कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत अभिजीत आणि सेजलनं सप्तपदी घेतल्या. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यांच्या लग्नाच्या आधीच्या कार्यक्रमांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील समोर आले आहेत. (Abhijeet Shwetchandra and Sejal Warde wedding)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : Prajakta Mali ला लग्नासाठी मराठी मुलगा नको, तर...; अभिनेत्रीच्या मैत्रिणीचा खुलासा

दरम्यान, सेजलनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून त्यांच्या हळदीचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. त्यांच्या या कार्यक्रमातील व्हिडीओ आणि फोटोंनी सगळ्यांना वेड लावले आहे. त्या दोघांच्या चेहऱ्यावर असलेला आनंद स्पष्ट पाहायला मिळत आहे. त्यांच्या फोटोवर कमेंट करत नेटकऱ्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सगळ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तर गेल्यावर्षी जून महिन्यात अभिजीत आणि सेजलनं गुपचूप साखरपूडा केला होता. त्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी याविषयी चाहत्यांना माहिती दिली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अभिजीतनं या मालिका आणि चित्रपटांमध्ये केलं काम

अभिजीतला खरी ओळख ही लक्ष्य या मालिकेतून मिळाली होती. त्यानंतर त्यानं अनेक मालिकांमध्ये काम केलें. या मालिकांशिवाय अभिजीतनं ‘बाजी’, ‘साजणा’, ‘बापमाणूस’ या चित्रपटांमध्येही काम केलं आहे. सध्या अभिजीत हा एका मालिकेत काम करत आहे. या मालिकेचे नाव ‘शुभविवाह’ या असून तो प्रेक्षकांचे दररोज मनोरंजन करत आहे.