पॉप स्टार लेडी गागा शिकतेय संस्कृत...

'लोका: समस्ता: सुखिनोभवंतु'

Updated: Oct 20, 2019, 08:05 PM IST
पॉप स्टार लेडी गागा शिकतेय संस्कृत... title=
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : हॉलिवूड सिंगर आणि अभिनेत्री लेडी गागा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. तिच्या चर्चेमागे कारणही तसंच आहे. लेडी गागाने रविवारी केलेल्या एका ट्विटने इंटरनेटवर चांगलाच धुमाकुळ घातला आहे. लेडी गागाने ट्विटरवर एक संस्कृत पोस्ट केला आहे. तिची ही पोस्ट वाचून भारतीय यूजर्स खुश झाले आहेत. पण इतर देशातील तिचे चाहते मात्र चांगलेच गोंधळून गेले आहेत. 

लेडी गागाने आपल्या ट्विटमध्ये 'लोका: समस्ता: सुखिनोभवंतु' अशी एका श्लोकातील ओळ पोस्ट केली आहे. तिने हे ट्विट केल्यापासून तिचे चाहते त्याचा अर्थ आणि या संस्कृत मंत्रामागील काय संदेश आहे? याचा शोध घेत आहेत. या श्लोकावरुन लेडी गागा संस्कृत शिकत असल्याचे दिसतेय.

'लोका: समस्ता: सुखिनोभवंतु' या मंत्राचा अर्थ आहे, साऱ्या जगात सगळेच आनंदात आणि स्वतंत्र्यात राहू दे. असा या श्लोकाचा शब्दश: अर्थ होतो. लेडी गागाच्या अनुशंगाने या श्लोकाकडे पाहायचे झाल्यास, सर्व जण आनंदी आणि स्वतंत्र्य राहू दे, माझ्या जीवनातील विचार, शब्द आणि कार्य कोणत्याही प्रकारे त्या आनंदासाठी आणि स्वातंत्र्यासाठी योगदान देऊ शकेल, असं तिने म्हटलंय.

लेडी गागाच्या या ट्विटनंतर ते सोशल मीडियावर ते चांगलंच व्हायरल होत आहे. आतापर्यंत ५० हजारहून अधिक लोकांनी ट्विट लाइक केलं असून ११ हजारहून अधिकांनी ते रिट्विट केलं आहे. अनेक लोक हे ट्विट पाहून गोंधळून गेलेत. तर काहींनी तिच्या या ट्विटचं स्वागत करत आनंद व्यक्त केला आहे. अनेक जण तिच्या ट्विटवर उत्तर देतानाही दिसतायेत.