'कुंडली भाग्य' फेम श्रद्धा आर्या होणार नववधू, या दिवशी घेणार सात फेरे!

टिव्ही आणि बॉलिवूड इंडस्ट्रीत सध्या लग्नाचा सीझन सुरुये. 

Updated: Nov 11, 2021, 10:42 PM IST
 'कुंडली भाग्य' फेम श्रद्धा आर्या होणार नववधू, या दिवशी घेणार सात फेरे! title=

मुंबई : टिव्ही आणि बॉलिवूड इंडस्ट्रीत सध्या लग्नाचा सीझन सुरुये. सगळीकडे सध्ये अफेअर्स आणि लग्नाच्या जोरदार चर्चा सुरु आहेत. अशामध्ये आता या लिस्टमध्ये टीवी शो 'कुंडली भाग्य' फेम श्रद्धा आर्या सामील झालीये. म्हटलं जातं की, श्रद्धा लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. 

१६ नोव्हेंबरला करणार लग्न
मिडीये रिपोर्ट्स नुसार, श्रद्धा या महिन्याच्या १६ नोव्हेंबरला लग्न करणार आहे. बातम्यांवर विश्वास ठेवायचा झाला तर, एक्ट्रेस राहूल नावाच्या मुलासोबत लग्नगाठ बांधणार आहे. जो नेवी ऑफिसर आहे. श्रद्धा आपल्या लग्नाच्या प्रत्येक बातमीला सिक्रेट ठेवू ईच्छिते. या खास क्षणी तिचा परिवार आणि काही खास माणसच उपस्थित असतील. एका वृत्तानुसार श्रद्धाने आपल्या कामावरुन दोन आठवड्यांची सुट्टी घेतली आहे. १२ नव्हेंबरला ती आपलं शूटिंग संपवून सुट्टयांवर जाणार आहे. असं म्हटलं जात आहे की, अभिनेत्रीचं लग्न दिल्लीत पार पडणार आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

श्रद्धाची दोन नाती तुटली
श्रद्धाच्या नात्याबद्दल बोलायचं झालं तर २०१५ मध्ये तिने एका एनआरआयसोबत एंगेजमेंट केली होती. पण नंतर दोघांचं ब्रेकअप झालं. यानंतर अभिनेत्री जालंधरमधील बिझनेसमन आलम मक्करसोबत रिलेशनशिपमध्ये आली. 2019 मध्ये दोघंही 'नच बलिये' या रिएलिटी शोचा भाग बनले होते. या प्लॅटफॉर्मवरून दोघांचं नाते उघड झालं. मात्र, शोच्या 2 महिन्यांनंतर श्रद्धा आणि आलमही वेगळे झाले.