"मी कम्फर्टेबल नाही", Kriti Sanon चा ऑडिशन व्हिडिओ Viral

ती लवकरच "गणपत" या चित्रपटात टायगर श्रॉफसोबत दिसणार आहे.

Updated: Oct 2, 2021, 11:04 AM IST
"मी कम्फर्टेबल नाही", Kriti Sanon चा ऑडिशन व्हिडिओ Viral title=

मुंबई : अभिनेत्री क्रिती सॅनन आज बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे आणि तिचा नुकताच आलेला 'मिमी' हा चित्रपट तिला यशाच्या शिखरावर घेऊन गेला आहे. यासोबत ती लवकरच "गणपत" या चित्रपटात टायगर श्रॉफसोबत दिसणार आहे.

क्रिती सॅननने तिच्या 8 वर्षांच्या बॉलिवूड कारकिर्दीत 10 चित्रपट केले आहेत, ज्यात 'बरेली की बर्फी', 'लुका छुपी' आणि इतर काही सिनेमांचा समावेश आहे. अभिनेत्रीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात ती तिच्या जुन्या लूकमध्ये दिसत आहे.

क्रिती सॅननने व्हिडीओमध्ये वन पीस घातलेला दिसत आहे आणि तिचे केस मोकळे सोडलेले आहेत, तिने व्हिडिओ मध्ये स्वतःची ओळख करून दिली आहे. तिचे म्हणणे आहे की तिची उंची 5 फूट 9 इंच आहे आणि ती तिची साईड प्रोफाइल पण दाखवत आहे. याशिवाय, तिला विचारले जाते की तिला पोहणे माहित आहे का, ज्याला तिने 'होय' म्हटले आहे. त्याच वेळी, ती असेही म्हणते, 'मी 2 पीस ड्रेस घालण्यास कम्फर्टेबल नाही.'

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या ऑडिशन क्लिपमध्ये क्रिती स्वतःची ओळख करून देताना दिसत आहे. पूर्वी क्रिती सॅननची एक मुलाखतही खूप व्हायरल झाली होती, या मुलाखतीत अभिनेत्रीने तिच्या संघर्षमय दिवसांच्या कथा शेअर केल्या.

क्रितीच्या म्हणण्यानुसार, संघर्षाच्या दिवसात ती शांत बसू शकत नसल्याने तिला राग यायचा, चिडायचा आणि रडायचा. क्रिती सॅनन सध्या 4 चित्रपटांमध्ये काम करत आहे, यामध्ये आदि पुरुष, भेडिया, शहजादा आणि बच्चन पांडे यांचा समावेश आहे.