मुंबई : प्रसिद्ध होण्यासाठी काहीपण... असंच एका लोकप्रिय अभिनेत्री, मॉडेलनं ठरवलं असावं. तिची वक्तव्य आणि तिच्या जीवनातील आतापर्यंतच्या घडामोडी पाहाता तरी असं म्हणणं वावगं ठरणार नाही.
जागतिक स्तरावर नावाजलेली ही सेलिब्रिटी आहे, किम कार्दशियन. किम प्रसिद्धीझोतात आली, तीच तिच्या एका सेक्स टेपमुळं. एक सेक्स टेप व्हायरल झाल्यामुळं किम रातोरात प्रसिद्ध झाली. (Kim Kardashian ready to eat bad things havock on social media)
आता तिची ही टेप कोणी, कधी व्हायरल केली या प्रश्नांची उत्तरं शोधायची झाल्यास बरंच मागं जावं लागेल. पण, सध्या किम का चर्चेत आलीये हे मात्र लगेचच स्पष्ट होत आहे. काही दिवसांपूर्वीच तिनं एक मुलाखत दिली, ज्या मुलाखतीत किमनं केलेल्या वक्तव्यानं सोशल मीडियावर एकच खळबळ माजली आहे.
किम काय बोलली?
एका प्रतिष्ठीत माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत किमनं आपण तरुण होण्यासाठी कुठवर पोहोचू शकतो यासंबंधीचं वक्तव्य केलं. 'मी काहीही करु शकते. तरुण दिसण्यासाठी मला मानवी विष्ठा खायला सांगितलं तर मी तेसुद्धा करेन', असं किम म्हणाली.
किमचं हे वक्तव्य ऐकताच सोशल मीडियावर एकच गोंधळ झाला. अनपेक्षितपणे किम जे काही म्हणाली ते प्रचंड हादरवणारं आणि किळसवाणं होतं. ज्यामुळं तिनं अनेकांचाच रोष ओढावला. प्रसिद्धीसाठी काही सेलिब्रिटी कोणत्याही थराला जातात हे खरं. पण, किमनं ही हद्दही ओलांडली असं म्हणणं वावगं ठरणार नाही.