khyatiworks खुलवतयं शहरांचं सौंदर्य, भारत सरकारने दिली या कलेला मान्यता

khyatiworks ही कंपनी महत्वाची भूमिका बजावत आहे.  

Updated: Jan 31, 2022, 06:57 PM IST
khyatiworks खुलवतयं  शहरांचं सौंदर्य, भारत सरकारने दिली या कलेला मान्यता title=

मंबई : अनेकदा आपण रस्त्यात चालताना घाणेरड्या भिंतीकडे पाहतो. हे पाहून निश्चितच आपल्याला किळस येते. अनेकजण तंबाखू, गुटखा खाऊन भिंतीवर थुंकतात. त्यामुळे या वाईट परिस्थितींना अनेकांना समोरं जावं लागत. पण तुम्हाला माहिती आहे का? या भिंतीचं सौंदर्यकरण करण्यासाठी अनेकजण आपापल्या परिने मेहनत घेत आहेत. 

खराब झालेल्या भिंती, रस्ते, त्याचप्रमाणे गृह संकुलांचा बाहेरील भाग आगळ्या-वेगळ्या चित्रकलेचा वापर करुन सुशोभिकरण करत आहेत. या स्टार्टअपमुळे रस्ते रंगीबेरंगी झाले आहेत. आता रस्त्यावरच्या भिंती जिथे चालताना अचानक फोटो काढावेसे वाटतात. यात khyatiworks ही कंपनी महत्वाची भूमिका बजावत आहे.  

khyatiworks या स्टार्टअपचे संस्थापक कीर्ती हे व्यवसायाने सॉफ्टवेअर इंजिनिअर. त्यांनी घरातील ड्रॉईंग रूममध्ये छंद म्हणून चित्रकला सुरू केली. त्याची सुरुवात त्यांनी  ग्रीटिंग कार्ड्स आणि बुकमार्क्सपासून केली. या त्यांच्या कलेला मित्र परिवाराने प्रतिसाद दिला आणि त्यांना कामही मिळू लागली. त्यानंतर  त्यांनी उदयन केअर या संस्थेसोबत टायअप केलं.  

लॉकडाऊनमध्ये  WFH च्या नावानं सर्वांचं काम दुप्पट झालं. घराची जबाबदारी, 2 वर्षाच्या मुलीचे ऑनलाइन क्लासेस, IT जॉब आणि आरोग्याचं आव्हान असतानाही khyatiworks ने तिच्या सर्जनशीलतेला आणि कामाला ब्रेक लावला नाही. लॉकडाऊनमध्ये ऑनलाइन मार्केटिंग करत विविध रस्ते आणि कुरुप झालेल्या भिंती वैगेरे रंगवून सुशोभिकरण्याचे महत्वाचं एक पाऊल पुढे टाकलं.

आज अनेक प्रसिद्ध चित्रकार गल्लीबोळातील भिंतींना सजावत आहेत. तर  मॉल्स, गृहसंकुल, शोरूम, रेस्टॉरंट याशिवाय अनेक आस्थापनाही यामुळे शोभून दिसत आहे. या नव्या व्यवसायामुळे चित्रकार आज लाखोंचा नफाही कमावत आहे.नुसत्या भिंतींवरच नाही तर रोजच्या वापरातील वस्तूंवरही त्यांची प्रतिभा दिसून येते. गृहोपयोगी वस्तू, दागिने, silk stoles, हे khyatiworks ची creativity आणि  talent ची ओळख बनली आहे. 

आज या स्टार्ट अपचे प्रोडक्ट जगातील अनेक देशांमध्ये एक्सपोर्ट केलं जातं. उद्योजकतेचे हे नवे रंग साहस आणि स्वप्नांना उड्डाण देण्याचं एक अद्वितीय उदाहरण आहे. स्ट्रीट आर्ट किंवा वॉल आर्टला परदेशाप्रमाणे भारतातही मागणी वाढत चालली आहे. जगभरात या केलेचे कौतुक होत असताना भारत सरकारनेही या स्ट्रीट आर्टला मान्यता देऊन या कलाकारांचा गौरवच केला आहे.