'आईचे दागिने...', मुंबईत घर घेतल्यानंतर हफ्ते भरताना अशी झाली होती केतकी माटेगावकरची अवस्था

Ketaki Mategaonkar Mumbai Home : केतकी माटेगावकरनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिचं घर घेण्याच्या निर्णयानंतर सगळं कसं जुळून आलं आणि त्यानंतर हफ्ते भरताना कशी काटकसर करावी लागली याविषयी सांगितलं आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Oct 14, 2023, 04:09 PM IST
'आईचे दागिने...', मुंबईत घर घेतल्यानंतर हफ्ते भरताना अशी झाली होती केतकी माटेगावकरची अवस्था title=
(Photo Credit : Social Media)

Ketaki Mategaonkar Mumbai Home : लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री केतकी माटेगावकर तिच्या अभिनयासोबतच तिच्या गाण्यांसाठी देखील ओळखली जाते. केतकीचा अंकुश हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं केतकी सतत प्रमोशन करताना दिसत आहे. तर यावेळी केतकीनं तिच्या आयुष्यातील अनेक खासगी गोष्टी शेअर केल्या. त्यात केतकीचं घर देखील आहे. गेल्या अनेक दिवसांपासून एकामागे एक मराठी कलाकार हे त्यांचं स्वत: चं स्वप्नातील घर खरेदी करताना दिसत आहे. अनेक कलाकार आता हे मुळचे मुंबईकर झाले आहेत. त्यांच्यात एक नाव केतकीचं देखील आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत केतकीनं घर घेण्याचा विचार आणि त्यानंतरचे हफ्ते याविषयी सांगितलं आहे. 

केतकीनं ही मुलाखत 'राजश्री मराठी'ला दिली आहे. यावेळी घर घेण्याच्या स्वप्नावर केतकी म्हणाली,  'मला मुंबईत घर घ्यायचं होतं. पण हे खरंच शक्य आहे का? असा विचार मनात यायचा. स्वत: घर होण्याचं स्वप्नं आता खरं झालं आहे. घर घ्यायचं ठरवलं तेव्हापासूनच स्वत: ला कामात झोकून घेतलं होतं. पैशांची जुळवाजुळव सुरू केली होती. घराचं डाऊन पेमेंट करताना तर पुरेवाट लागते. अक्षरशः चांदण्या चमकायला लागतात.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : अथिया शेट्टीचा रॅम्प वॉक नाही तर 'या' गोष्टीला पाहून तुम्हालाही होईल हसू अनावर

अशी केली घराचे हफ्ते भरण्यासाठी काटकसर

पुढे घर घेतल्यानंतर हफ्ते भरण्यासाठी काटकसर कशी केली याविषयी केतकी म्हणाली, 'माझं कसं होतं की पाहिजे तेवढी मज्जा करायची, शॉपिंग करायची, आवडलं की लगेच ऑर्डर करायचं. पण आता स्वत:लाच मी समजवते. एखादी मोठी गोष्ट हवी असेल तर काही गोष्टी कमी कराव्याच लागणार आहेत. अनेक गोष्टी मी स्वत:हून कमी केल्या. शॉपिंग नाही म्हटलं तर नाहीच. मी अनेक खर्च कमी केलेत. कधी काही असेल तर आईकडून दगिने घेतले, तर कधी मैत्रिणींचे, बहिणींचे कपडे घातले...असं मी केलं. ठरवून बचत केली. आता मी शक्य तेवढं भरपूर काम करतेय.'

घर घेतल्यानंतर केतकीला कामही खूप मिळाली!

केतकी पुढे म्हणाली की 'हे घर घेतलं आणि मला आणखी एक चित्रपट मिळाला. तुम्ही एखादी गोष्ट करण्याचं ठरवता तेव्हा अनेक गोष्टी जुळून येतात. घर घेतल्यापासून कामही वाढलं आहे.' दरम्यान, केतकी ही तिच्या ‘काकस्पर्श’, ‘तानी’ आणि ‘टाइमपास’ या चित्रपटांसाठी ओळखली जाते. मुळची गायक असणाऱ्या केतकीला ‘शाळा’मध्ये सुजय डहाके यांनी ब्रेक दिला.