KBC Sushil Kumar story: केबीसी या शोनं सामान्य प्रेक्षकाचं स्वप्न पुर्ण केलं आहे. अनेकांची स्वप्नं या शोमधून पुर्ण झाली आहेत. अशाच एका व्यक्तीनं केबीसीतून कोट्यावधी कमावले परंतु त्याच्या नशीबात मात्र काहीतरी वेगळं लिहिलं होतं. त्यानं या शोमधून 5 कोटी रूपये जिंकले परंतु त्याच्या नशीबी मात्र कंगाल होण्याशिवाय दुसरं काहीच लिहिलं नव्हतं असंच त्याच्यासोबत घडलेल्या प्रकारावरून समजून येतं. (kbc winner sushil kumar shares his experience after losing kbc winning amount viral news)
सुशील कुमारने जिंकलेल्या 5 कोटी रुपयांमुळे त्याचं आयुष्यचं बदलून गेलं परंतु सुशीलकुमारच्या वाईट काळालाही सुरुवात व्हायला वेळ देखील लागला नाही. सुशीलकुमारने फेसबूक पोस्टवर लिहिलं की, कौन बनेगा करोडपती जिंकल्यानंतर त्याच्यावर वाईट वेळ चालून आली. यानंतर काही दिवसांनी मी कंगाल झालो.
2015 आणि 2016 ही दोन वर्ष माझ्यासाठी खूप कठीण होती. मी केबीसीमुळं सेलिब्रिटी झालो होतो, बिहारमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी महिन्यात दहा ते पंधरा शो मी अटेन्ड करत होतो. याच दरम्यान मी आपल्या अभ्यासापासून दूर देखील जात होतो.
अनेक पत्रकार माझ्याबद्दल लिहित होते, माझी मुलाखत देखील घेत होते. मला त्यांच्याशी बोलण्याचा कोणताही अनुभव नव्हता. तरी देखील मी त्यांना आपल्या गोष्टींबद्दल सांगायचो. कारण लोकांना वाटू नये की मी बेरोजगार आहे. खरंतर काही दिवसांनीच माझा बिझनेस तोट्यात येत होता हे माझ्या लक्षात आलं.
सुशीलच्या म्हणण्यानुसार केबीसीनंतर तो एका महिन्यात अनेक इव्हेंटला उपस्थित राहून पैसे दान करत होतो. ज्यामुळे अनेक वेळा लोकांनी त्याला फसवलं. ज्याविषयी त्याला उशीरा समजलं.
या प्रकारानंतर त्याला दारु आणि सिग्रेटचं त्याला व्यसन लागलं होतं. सुशीलने दिलेल्या माहितीनुसार एका रात्री तो सिनेमा पाहत होता, यावर त्याच्या पत्नीला राग आला, त्यांचं थोडं भांडण झालं, तो नाराज होत घराबाहेर आला, यानंतर एका इंग्रजी दैनिकाच्या पत्रकाराने त्याला कॉल केला. त्या पत्रकाराशी माझं चांगलं बोलणं सुरु होतं, तेव्हाच सुशील यांना असा प्रश्न विचारण्यात आला तो त्याला आवडला नाही. या प्रश्नावर सुशीलने उत्तर देताना सांगितलं, कौन बनेगा करोडपती या शो मधून जिंकलेले पाच कोटी रुपये आता संपलेले आहेत, मी दोन गाई पाळल्या आहेत आणि त्यांचं दूध विकून घर चालवतोय.
आता सुशील काय करतोय - सुशीलने शिक्षक होण्याची तयारी केलीय, आणि तो ट्यूशनही घेतोय. आता दारु आणि सिग्रेट कायमची सोडली आहे. सुशील आता पर्यावरण संवर्धनसाठीही काम करतोय अशी माहिती समोर आली आहे.