या व्यक्तीमुळे वाचला अमिताभ यांच्या मुलीचा जीव

कोण हा विकास सिंह 

या व्यक्तीमुळे वाचला अमिताभ यांच्या मुलीचा जीव  title=

मुंबई : कौन बनेगा करोडपती हा कार्यक्रम सुरूवातीपासूनच लोकप्रिय आहे. या कार्यक्रमात येणारे स्पर्धक आणि अमिताभ बच्चन यांच्यातील संवाद हा कायमच वाखाण्यासारखा असतो. 23 ऑक्टोबरचा एपिसोड आणि त्यामधील स्पर्धक हे बिग बींना थोडा धक्का देणारे होते. दोन महिलांनंतर हॉट सीटवर विकास सिंह हॉट सीटवर येऊन बसले. 

व्यवसायाने रेडिओ फ्रीक्वेंसी मॅनेजर असलेले विकास सिंह यांनी एक किस्सा सांगितला. हा ऐकून बिग बी सुरूवातीला थोडे घाबरले. पण नंतर त्यांनी विकास सिंह यांचे आभार मानले. एवढंच नव्हे तर त्यांना घरी येण्याचा आग्रह देखील केला. 

नेमकं असं काय केलं?

विकास यांनी सांगितलं की, ते एकदा रेडिओ फ्रीक्वेंसी तपासण्यासाठी अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता हिच्या घरी गेले होते. तेव्हा त्यांनी सांगितलं की, श्वेता यांच्या घरातील रेडिएशनचा स्तर थोडा जास्त होता. पण विकास यांनी तो कंट्रोल केला. 

हे ऐकताच बिग बींना रेडिएशनचा स्तर जास्त असल्याचा ऐकताच धक्का बसला. बिग बींनी विकास यांना आपल्या घरी देखील आमंत्रित केलं. तेव्हा विकास वेळ न घालवता म्हणाले की, ज्या दिवशी तुम्ही असाल त्या दिवशी मला बोलवा. म्हणजे मला 4 - 5 ऑटोग्राफ एकत्र मिळतील. 

ही चर्चा झाल्यानंतर बिग बी यांनी कौन बनेगा करोडपती खेळाला सुरूवात केली. विकास सिंह उत्तम खेळत आहेत. वेळ संपल्यामुळे ते आज बुधवारच्या दिवशी देखील खेळणार आहेत. तसेच विकास यांनी त्यांच्या आयुष्यातील भावूक गोष्ट देखील शेअर केली. विकास हे लग्न करण्यासाठी घर सोडून गेले. तेव्हापासून त्यांचा भाऊ त्यांच्याशी बोलत नाही. केबीसीच्या माध्यमातून विकास सिंह यांनी भावाची माफी मागितली.