गुडन्यूज....! कतरिना कैफ प्रेग्नंट; कॅमेरासमोर हुशारीने झाकला बेबी बंप?

कतरिना कैफ अलीकडेच विकी कौशलसोबत व्हेकेशन सेलिब्रेट करून मालदीवमधून परतली आहे. 

Updated: Aug 1, 2022, 06:53 PM IST
गुडन्यूज....! कतरिना कैफ प्रेग्नंट; कॅमेरासमोर हुशारीने झाकला बेबी बंप? title=

मुंबई : कतरिना कैफ अलीकडेच विकी कौशलसोबत व्हेकेशन सेलिब्रेट करून मालदीवमधून परतली आहे. या व्हेकेशनमध्ये अभिनेत्रीने असे फोटो शेअर केले आहेत की, सोशल मीडियावर तिची खूप चर्चा झाली. पण आता अभिनेत्रीने सुट्टीवरून परत येताच असा एक व्हिडिओ शेअर केला आहे की, तो व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री ड्रेसची बटणे उघडून कॅमेऱ्यासमोर अशा प्रकारे पोज देत आहे की, व्हिडिओ पाहून विकी कौशलही थक्क होईल. अभिनेत्रीचा हा व्हिडिओ चर्चेत आहे.

घातले बोल्ड कपडे
व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की कतरिना कैफने शर्ट स्टाइलचा ड्रेस घातला आहे. हा ड्रेस केवळ थाई स्लिट नाही तर अभिनेत्रीने या ड्रेसच्या वरच्या बाजूची बटणंही उघडली आहेत. हा ड्रेस परिधान करून अभिनेत्री कॅमेऱ्यासमोर तिचे सौंदर्य फ्लाँन्ट करताना दिसली.

हवेच्या झोकाने उडाला ड्रेस
या व्हिडिओमध्ये अभिनेत्री ड्रेसची बटणं उघडून कॅमेऱ्यासमोर केस मोकळे सोडून पोज देताना दिसली. त्याचबरोबर ती तिच्या स्टाईलची अशी जादू पसरवत आहे की, तिच्या सौंदर्यावर चाहते फिदा होतील.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

कतरिना कैफने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर कॅप्शनसह हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये तिने लिहिलं आहे की, 'थोडी पोज आणि थोडे  हेयर फ्लिक.' अभिनेत्रीने हा व्हिडिओ शेअर करताच चाहत्यांनी तिच्या व्हिडिओवर कमेंट करून तिच्या लुकचं कौतुक केलं आहे.

कतरिना कैफ अनेकदा सैल कपड्यांमध्ये दिसली होती. त्यानंतर अभिनेत्रीच्या प्रेग्नेंसीच्या बातम्या येऊ लागल्या. आता पुन्हा एकदा अभिनेत्री सैल कपड्यांमध्ये दिसल्यामुळे या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे. मात्र, याबाबत कतरिना किंवा विकी कौशल यांच्याकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेलं नाही. कतरिना आणि विकी कौशलं लग्न गेल्या वर्षी ९ डिसेंबरला सवाई माधोपूरमध्ये झालं.