Kartik-Kiara : शूटींग संपताच कार्तिकने केला कियाराचा चेहरा खराब, व्हिडिओ पाहून चाहते हैराण

'भूल भुलैया 2'च्या यशानंतर कार्तिक आर्यनचे चाहते त्याच्या पुढच्या 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Updated: Oct 6, 2022, 07:27 PM IST
Kartik-Kiara : शूटींग संपताच कार्तिकने केला कियाराचा चेहरा खराब, व्हिडिओ पाहून चाहते हैराण title=

मुंबई : 'भूल भुलैया 2' (Bhool Bhulaiya 2) च्या यशानंतर कार्तिक आर्यनचे चाहते त्याच्या पुढच्या 'सत्यप्रेम की कथा' (Satyaprem ki Katha)या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात कार्तिक  (Kartik Aryan) पुन्हा एकदा कियारा अडवाणी  (Kiara Advani) सोबत रोमान्स करताना दिसणार आहे. दसऱ्याच्या दिवशी चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालं आहे. अशा परिस्थितीत कार्तिनने त्याच्या टीमसोबत खूप मजा केली आणि अभिनेत्याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्रामवर काही फोटो आणि व्हिडिओ देखील शेअर केले. ज्यामध्ये व्हिडीओमध्ये कार्तिक आणि कियाराची बॉन्डिंग चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे.

कार्तिकने कियारासोबत खूप मजा केली
'सत्यप्रेम की कथा' चित्रपटाच्या रॅप शूट दरम्यान, चित्रपटाच्या संपूर्ण टीमने मिळून केक कापला. यादरम्यान कियाराने जेव्हा कार्तिकच्या चेहऱ्यावर केक लावला तेव्हा कलाकारही स्वतःला रोखू शकले नाहीत. मात्र, कार्तिकने कियाराच्या चेहऱ्यावर छोटा केक लावला. शूटिंगदरम्यान चित्रपटाच्या टीमने किती धम्माल केली हे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. आता यानंतर चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. याशिवाय कार्तिक संपूर्ण टीमसोबत गरबाही खेळला. कियारा आणि कार्तिकच्या चाहत्यांना त्यांची केमिस्ट्री खूप आवडते.

एका महिन्यात शूटिंग पूर्ण झालं
कार्तिक आर्यनने ३ सप्टेंबरपासून 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली होती. जवळपास महिनाभरात त्याने शूटिंगचं वेळापत्रक पूर्ण केलं आहे. अशा परिस्थितीत कार्तिक आणि कियारा त्यांच्या चित्रपटाच्या टीमसोबत सेलिब्रेशन करताना दिसले.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

इंस्टाग्रामवर हे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत कार्तिकने कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'संपूर्ण महिना सत्यप्रेम की कथेच्या संपूर्ण टीमसोबत व्यस्त ठेवला, पण सात अतिशय मजेदार कार्यक्रमांनंतर शूटिंग संपलं. अनेक सेलिब्रेशन्स आणि मिनी गरबा' सह. त्याचवेळी कार्तिकच्या बाकीच्या प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचं झालं तर या चित्रपटाव्यतिरिक्त कार्तिक 'शेहजादा', 'कॅप्टन इंडिया' आणि 'आशिकी 3' या चित्रपटांमध्येही दिसणार आहे.