कार्तिक आर्यनने 'या' बॉलिवूड अभिनेत्रीला केलं आहे का डेट?

कार्तिक आर्यन हा बॉलिवूडचा असा स्टार आहे. ज्याने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Updated: May 25, 2022, 08:51 PM IST
कार्तिक आर्यनने 'या' बॉलिवूड अभिनेत्रीला केलं आहे का डेट? title=

मुंबई : कार्तिक आर्यन हा बॉलिवूडचा असा स्टार आहे. ज्याने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. 'प्यार का पंचनामा' या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणारा कार्तिक सध्याच्या युगातील तरुण कलाकार आहे. पण अनेकदा कार्तिक आर्यनचं नाव को-स्टारसोबतच्या नात्याच्या मुद्द्यांमुळे चर्चेत राहिलं आहे.

सध्या 'भूल भुलैया 2' या स्टारने या प्रकरणावर आपले मौन तोडलं असून त्याने यापूर्वी बॉलिवूड अभिनेत्रीला डेट केल्याचं मान्य केलं आहे. त्यानंतर सर्वत्र त्या अभिनेत्रीचं नाव शोधण्याची स्पर्धा लागली आहे.

काय सारा अली खान होती ती एक्ट्रेस?
बॉलिवूडचा नवाब सैफ अली खानची मुलगी सारा अली खानचं नाव कार्तिक आर्यनसोबत खूप दिवसांपासून जोडलं जात होतं. सारा आणि कार्तिकने बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक इम्तियाज अली यांच्या लव्ह आज कल २ मध्ये एकत्र काम केलं होतं. हे दोन्ही स्टार्स एकमेकांसोबत असल्याची चर्चा सर्वत्र रंगली होती. मात्र या प्रकरणाची कधीही पूर्ण पुष्टी झाली नाही.

मात्र, यादरम्यान सारा अली खान आणि कार्तिक आर्यन अनेकदा एकमेकांसोबत दिसले आहेत. पण जेव्हा कार्तिक आर्यनला हा प्रश्न विचारण्यात आला की, तो अभिनेत्री सारा अली खानला डेट करतो का? तेव्हा यावर कार्तिकने साफ नकार दिला.

कार्तिक आर्यनसाठी साराने सांगितली ही गोष्ट
2018 मध्ये सारा अली खानने टीव्हीच्या प्रसिद्ध शो कॉफी विथ करणमध्ये कार्तिक आर्यनबद्दल मोठा खुलासा केला होता.  त्याच्याबद्दल बोलताना सारा म्हणाली की, तिला कार्तिक आर्यनसोबत डेटवर जायचं आहे आणि तो तिचा क्रश आहे. लव्हआज कल २ मध्ये दोघांना एकत्र दाखवलं असलं तरी. या चित्रपटानंतर हे दोघं पुन्हा कधीच एकमेकांसोबत दिसले नाहीत.