मुंबई : नवीन वर्षाची सुरूवात आणखी एका प्रेम चर्चेने झाली आहे. बॉलिवूडमध्ये दबक्या आवाजात आणखी एक प्रेम फुलताना दिसत आहे. हे कपल दुसरं तिसरं कुणी नाही तर कार्तिक आर्यन आणि अनन्या पांडे आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दोघांना एकत्र अनेक ठिकाणी पाहिलं गेलं आहे. कधी सिनेमा पाहायला तर कधी डिनरकरता एकत्र गेल्याचे कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.
गेल्या काही दिवसांपूर्वी त्या दोघांना एकत्र पाहण्यात आलं तेव्हा मीडियात याची चर्चा झाली. कार्तिक आणि अनन्या एकमेकांना डेट करत आहेत? यानंतर कार्तिकने सफाई दिली होती की, ते दोघं फक्त डिनर करता एकत्र गेले होते.
आता फिल्मफेअरच्या माहितीनुसार, कार्तिक आणि अनन्या खरंच रिलेशनशिपमध्ये आहेत. कार्तिक आर्यन आता बॉलिवूडमधील लोकप्रिय नाव झालं आहे. आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या सिनेमांना प्रेक्षकांनी खूप पसंत केलं आहे. तो बॉलिवूडचा चॉकलेट हिरो ठरला आहे.
काही दिवसांपूर्वी सैफ अली खानची मुलगी साराने कार्तिक आर्यनला डेट करण्याबाबत चर्चा केली होती. सारा वडिल आणि अभिनेता करण जोहरसोबत 'कॉफि विथ करण'च्या शोमध्ये पोहोचली होती. तेव्हा साराने कार्तिक आर्यनला डेट करणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर रणवीरने एका कार्यक्रमात साराची भेट कार्तिक आर्यनशी करून दिली होती.
पण आता कार्तिक-अनन्याची अफेअरची चर्चा ऐकून साराला वाईट वाटलं असेल. अनन्या पांडे, चंकी पांडेची मुलगी असून करण जोहरच्या 'स्टुडंट ऑफ द ईअर 2'च्या शुटिंगमध्ये सध्या ती व्यस्त आहे.