मुंबई : बॉलीवूडचा नवाब सैफ अली खान आणि अभिनेत्री करीना कपूरच्या लाडक्या तैमूरने बुधवारी आपला वाढदिवस साजरा केला. त्याच्या या बर्थडेसाठी करीना कपूर आणि त्याची न्यूट्रिशनिस्ट ऋतुजा दिवेकर यांनी तैमूरला एक जंगलच गिफ्ट केलंय.
ही माहिती ऋतुजाने सोशल मीडियावरुन दिलीये. या फोटोत तैमुरचे जंगल असं लिहिलंय. या जंगलाची खासियत म्हणजे येथील झाडे ही तैमुरच्या वयाची आणि त्यापेक्षा लहान आहेत.
ऋतुजाने हा फोटो शेअर करताना म्हटलंय, लहानग्यांना चिमण्या, फुलपाखरे खूप आवडतात. याच गोष्टी जवळून पाहण्यासाठी तैमुरसाठी हे जंगल तयार करण्यात करण्यात आलंय. मुंबईजवळ हे जंगल आहे. या जंगलात विविध प्रकारची झाडे लावण्यात आली आहेत.
हे जंगल 1,000 चौरस फुटापर्यंत पसरलेय. यात १०० झाडे लावण्यात आली आहेत. यात तीन जांभूळ, १ फणस, १ आवळा, ४० केळ्यांची झाडे, १४ शेवग्याच्या शेंगाची झाडे, एक कोकम, एक पपई, ५ सीताफळ, दोन लिंबाची झाडे लावण्यात आली आहेत. याशिवाय अनेक प्रकारच्या हिरव्या भाज्या, झेंडूची फुले यांचीही झाडे लावण्यात आली आहेत.
करीना गरोदर असताना ऋतुजाने दिलेला डाएट प्लान फॉलो करत होता. करीनाच्या गरोदरपणाच्याकाळात ऋतुजा पूर्णवेळ देत होती. तैमुरला हे गिफ्ट ऋतुजानेत करीनाला सुचवल्याचे समजतेय.