भर ईव्हेंटमध्ये करिनाच्या ब्लाऊजने दिला धोका, झाली Oops Moment ची शिकार

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर तिच्या जबरदस्त ड्रेसिंग सेन्ससाठी ओळखली जाते.

Updated: Sep 4, 2021, 06:20 PM IST
भर ईव्हेंटमध्ये करिनाच्या ब्लाऊजने दिला धोका, झाली Oops Moment ची शिकार title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर तिच्या जबरदस्त ड्रेसिंग सेन्ससाठी ओळखली जाते. पण कधीकधी सेक्सी ड्रेस घालून गेल्यावर अभिनेत्री oops momentची शिकार बनली आहे. असंच एकदा करीनासोबत घडलं जेव्हा तिने सुंदर साडी घातली होती. पण या साडीसोबत कॅरी केलेल्या ब्लाउजमुळे करीनाला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागलं.

करीनाची सुंदर साडी
करीना कपूर जिथे जाईल तिथे पापाराझी तिच्या मागे धावतात. एकदा करीनाचा असाच एक फोटो समोर आला होता ज्यात करीनाच्या फॅशनची चूक पकडली गेली होती. वास्तविक, करीना कपूर काही वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात गेली होती. हा कार्यक्रम तिचा चुलत भाऊ अरमान जैनच्या चित्रपटाच्या म्युझिक लाँचसाठी होता. ज्यामध्ये केवळ करीनाच नाही तर करिश्मा कपूरपासून जवळजवळ संपूर्ण कपूर कुटुंब पोहोचलं होतं.

बेबो तिचा सपोर्ट शो करण्यासाठी तिथे पोहोचली तेव्हा कॅमेरे तिच्या दिशेने वळले. त्या खास दिवसासाठी करीनाने पांढऱ्या रंगाची साडी निवडली होती

ब्लाउजला लावला सेफ्टिपिन
स्टाईलच्या मध्ये नेमकी कोणाची ही चूक कशी झाली हे नक्की माहिती नाही. करिनाची की तिच्या स्टाईलिस्टची, सहसा तिची टीम देखील करिनासोबत प्रत्येक कार्यक्रमात उपस्थित असते, पण असं वाटतं की, बेबोने चुलतभावाशी संबंधित कार्यक्रमामुळे एवढा भार उचलला नाही आणि म्हणूनच तिच्या कडून ही चूक झाली आहे. प्रत्यक्षात, करीनाचा लूक समोरून चांगला दिसत होता पण ती मागच्या बाजूला दिसताच तिच्या ब्लाउजमधून बाहेर पडलेल्या सेफ्टी पिनने लुक खराब केला. करिना oops moment टाळण्यासाठी अभिनेत्रीने या सेफ्टी पिनचा वापर केला आहे.

करीनाचे चित्रपट
करीना कपूरने या वर्षी दुसऱ्या मुलाला जन्म दिला. मुलाच्या जन्मानंतर काही महिन्यांनी ती कामावर परतली. दरम्यान, तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ज्यात तिचा वेगळा लूक पाहायला मिळाला. करीना कपूरकडे सध्या कोणत्याही बॉलिवूड चित्रपटाच्या ऑफर नाहीत. मात्र, ती लाल सिंह चड्ढा या चित्रपटात आमिर खानसोबत दिसणार आहे. या वर्षी ख्रिसमसच्या निमित्ताने हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.