'प्रेग्नेंसी बायबल'च्या वादानंतर करिनाच्या दुसऱ्या मुलाचा फोटो लीक

करिना कपूर खानने  21 फेब्रुवारी 2021 रोजी दुसर्‍या मुलाला जन्म दिला. अभिनेत्रीने जेहचा फोटो त्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट करणं टाळलं.

Updated: Jul 15, 2021, 04:55 PM IST
'प्रेग्नेंसी बायबल'च्या वादानंतर करिनाच्या दुसऱ्या मुलाचा फोटो लीक title=

मुंबई : बेबो करीना कपूर खानच्या दुसऱ्या मुलाचा फोटो सोशल मीडियावर लीक झाला आहे. पहिल्यांदाच छोट्या नवाबचा चेहरा समोर आल्याने हा फोटो वेगाने व्हायरल होतो आहे. करिना कपूर खान सध्या तिच्या प्रेग्नेंसी बायबल या बुकमुळे वादात अडकली आहे. त्यात लगेचच मुलगा जेह अली खानचा फोटो समोर आल्याने एकच चर्चा रंगली आहे. करिनाच्या फॅन पेजवर हा फोटो पोस्ट करण्यात आला आहे. ज्यात करिना बाळाचे लाड करताना दिसते आहे.

 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kareena Kapoor Khan (@therealkareenakapoor)

जेह अली खानचा हा पहिलाच फोटो समोर आल्यानंतर अनेकांनी हा फोटो शेअर करायला सुरुवात केली आहे. या फोटोत जेह अली खान शांत पाळण्यात झोपलेला दिसून येत आहे. बेबो आणि जेहच्या या गोड फोटोवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे. 

प्रेग्नेंसी बुकमुळे करीना वादात 
एकीकडे करीना कपूर खान आणि जेह अली खान यांचा पहिला वहिला फोटो समोर आला आहे, त्यामुळे या फोटोवर करिनाच्या फॅन्सकडून कमेंटचा वर्षाव होत आहे. तर दुसरीकडे अभिनेत्री तिच्या प्रेग्नन्सी पुस्तकांमुळे सोशल मीडियावर खूपच ट्रोल होत आहे. करीना कपूर खानने तिच्या पुस्तकाचे नाव 'प्रेग्नन्सी बायबल' असं ठेवले आहे. या नावावर ख्रिश्चन समाजातील सदस्यांनी आक्षेप  घेतला आहे. या समाजाने धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप  अभिनेत्रीवर केला आहे.

 5 महिन्यांनंतर छोट्या नवाबचा फोटो समोर 

करिना कपूर खानने  21 फेब्रुवारी 2021 रोजी दुसर्‍या मुलाला जन्म दिला. अभिनेत्रीने जेहचा फोटो त्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट करणं टाळलं. पण लोक छोट्या नवाबची पहिली झलक पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत होते. करिनाने बर्‍याचदा आपल्या मुलाची झलक दाखविली आहे. पण अद्याप जेहचे स्पष्ट असे फोटो समोर आले नव्हते. आता समोर आलेल्या फोटोमध्ये देखील जेहचा चेहरा काहीसा अस्पष्ट दिसत आहे.