Tejasswi Karan House: करण कुंद्रा आणि तेजस्वीकडून दुबईत आलिशान घर खरेदी, किंमत जाणून घ्या

Tejasswi Karan House: करण कुंद्रा आणि तेजस्वीने दुबईत घेतलं आलिशान घर, किंमत एकूण धक्का बसेल 

Updated: Nov 18, 2022, 07:49 PM IST
Tejasswi Karan House: करण कुंद्रा आणि तेजस्वीकडून दुबईत आलिशान घर खरेदी, किंमत जाणून घ्या  title=

Tejasswi Karan House: टीव्हीच फेमस कपल तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) आणि करण कुंद्रा (Karan Kundrra) यांनी दुबईमध्ये एक आलिशान घर खरेदी केले आहे.दुबईच्या पॉश भागात त्यांनी हे घर खरेदी केले आहे. अत्यंत आलिशान असे हे घर आहे.कंपनीच्या लॉन्च इव्हेंटमध्ये करण कुंद्राने त्याच्या नवीन घराची घोषणा केली, ज्याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.

तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) आणि करण कुंद्रा (Karan Kundrra) हे टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वाचे लाडके आणि लोकप्रिय जोडपे बनले आहेत. त्यांची लोकप्रियता अनेक पटींनी वाढली आहे. त्यामुळे दोघेही लक्झरी लाइफमध्ये कोणतीही कसर सोडत नाहीत. नुकतेच दोघांनी दुबईत एक आलिशान घर घेतले आहे.

व्हिडिओत काय?

काही दिवसांपूर्वी करण कुंद्रा (Karan Kundrra) आणि तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash)  विमानतळावर स्पॉट झाले होते. यावेळी चाहत्यांनी दोघेही व्हेकेशन एन्जॉय करण्यासाठी जात असल्याचा अंदाज बांधला होता. पण प्रत्यक्षात दोघेही घर खरेदीसाठी दुबईत आले आहेत. या संदर्भातला व्हिडिओही समोर आला आहे. व्हिडिओमध्ये करण कुंद्रा पांढऱ्या रंगाच्या सूटमध्ये दिसत आहे, तर तेजस्वीनेही गोल्डन ड्रेस परीधाण केला आहे. यावेळी कंपनीच्या लॉन्च इव्हेंटमध्ये करण कुंद्राने त्याच्या नवीन घराची घोषणा केली. 

आलिशान घराची किंमत किती? 

करण कुंद्रा (Karan Kundrra) आणि तेजस्वी प्रकाशने (Tejasswi Prakash) दुबईत वन बीएचके फ्लॅट घेतला आहे. ज्याची किंमत 2 कोटी रुपये आहे. त्याच्या आलिशान घरात इनडोअर पूलसह अनेक लक्झरी सुविधाही आहेत. दुबईच्या पाम जुमेरा बीच रेसिडेन्समध्ये त्याचे प्लस साइज अपार्टमेंट आहे. यापूर्वी तेजस्वी प्रकाशने गोव्यात एक अपार्टमेंट खरेदी केले होते. इतकेच नाही तर काही काळापूर्वी करण कुंद्रा मुंबईत एका आलिशान फ्लॅटचा मालकही बनला होता.

दरम्यान वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) सध्या तिच्या मराठी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्याचवेळी करण कुंद्रा (Karan Kundrra) एका पंजाबी चित्रपटात काम करत आहे.