मुंबई : अभिनेत्री तेजस्वीने 'बिग बॉस' शोपासून चाहत्यांच्या मनात राज्य केलं आहे. 'नागीन' फेम अभिनेत्री तिच्या कामामुळे आणि अभिनेता करण कुंद्रासोबत असलेल्या नात्यामुळे कायम चर्चेत असते. आता देखील एका गंभीर घटनेमुळे करण आणि तेजस्वी चर्चेत आले आहेत. करणचा एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये त्याच्या मनात तेजस्वीसाठी असलेली काळजी आणि चिंता स्पष्ट दिसून आली.
दरम्यान, नुकताचं तेजस्वी तिच्या घराबाहेर स्पॉट झाली, तेव्हा फोटोग्राफर्सनी तेजस्वीला कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी एकचं गर्दी केली, तेव्हा एक फोटोग्राफर थेट अभिनेत्रीच्या घरात घुसला. त्यामुळे ती प्रचंड घाबरली.
या घटनेनंतर तेजस्वीने कोणती प्रतिक्रिया दिली नाही. पण करणने मात्र नाराजी व्यक्त केली, तो म्हणाला, 'असं चांगलं वाटतं का. मुलगी आहे. तुमचा आदर करतो. काही बोलत नाही. याचा अर्थ असा नाही की तुम्ही घरात घुसाल...'
करण पुढे म्हणाला, 'माझी गर्लफ्रेंड आहे. मला आवडलं नाही. मी बिलकूल सहन करू शकत नाही... आता बघू पुढे काय होईल...' सध्या करणचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.