'माझ्या छातीवर हात ठेवला... प्रसिद्ध अभिनेत्याची भर स्टेजवर छेडछाड

एका कार्यक्रमादरम्यान मी स्टेजवर पोहोचलो, तिथे काही लोक दारूच्या नशेत होते. 

Updated: Mar 10, 2022, 05:59 PM IST
  'माझ्या छातीवर हात ठेवला... प्रसिद्ध अभिनेत्याची भर स्टेजवर छेडछाड title=

मुंबई : 'द कपिल शर्मा शो'मध्ये 'दादी' म्हणजेच अली असगरने आपल्या कॉमेडीने घराघरात आपलं वेगळं स्थान मिळवलं आहे. अली असगरच्या 'दादी'च्या या व्यक्तिरेखेने प्रेक्षकांना खूप हसवले, पण कॉमेडियनने एक धक्कादायक प्रकार सगळ्यांसमोर अखेर सांगितला आहे.

अली असगरने आपल्या एका मुलाखतीत सांगितले होते की, त्याच्यासोबत गंभीर प्रकार घडला आहे, काही मद्यधुंद लोकांनी त्याच्यासोबत गैरवर्तन केले.

 अली असगरने  एका मुलाखतीत आपली व्यथा मांडली होती. अली असगरने सांगितले की, 'मला कपिल शर्मा शोमध्ये दादीच्या भूमिकेसाठी खूप प्रेम मिळाले.

मला एक महिला म्हणून इतर शोमधून ऑफर येत होत्या, पण काही काळानंतर मला वाटू लागले की आता मला पुरुषांची भूमिका मिळणार नाही. अली असगरने पुढे मुलाखतीत सांगितले की, तो एकदा विनयभंगाचाही शिकार झाला होता.

कॉमेडियन म्हणाला, "मी जेव्हा कधी शोमध्ये जायचो तेव्हा नावाने नाही तर दादी म्हणून ओळख करून द्यायचो.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ali Asgar (@kingaliasgar)

एका कार्यक्रमादरम्यान मी स्टेजवर पोहोचलो, तिथे काही लोक दारूच्या नशेत होते. या लोकांनी मला अचानक घेरले आणि माझ्यावर तुटून पडले. अली असगर म्हणाला, 'माझ्या छातीवर हात ठेवला, चिमटा काढला. आमच्या टीममधली एक मुलगी होती जिने मला वाचवले."