'मुबारकां'ची टीम प्रमोशनशिवाय कपिलच्या सेटवरून माघारी...

कॉमेडियन कपिल शर्माच्या अडचणी संपण्याचं काही नाव घेत नाहीत.

Updated: Jul 21, 2017, 02:16 PM IST
'मुबारकां'ची टीम प्रमोशनशिवाय कपिलच्या सेटवरून माघारी... title=

मुंबई : कॉमेडियन कपिल शर्माच्या अडचणी संपण्याचं काही नाव घेत नाहीत. पुन्हा एकदा कपिल शर्माच्या सेटवरून एका सिनेमाच्या टीमला प्रमोशन न करताच माघारी जावं लागलंय. 

मीडियानं दिलेल्या बातमीनुसार, 'द कपिल शर्मा शो'च्या सेटवर 'मुबारकां' या चि़त्रपटाची टीम तब्बल चार तास कपिलची वाट पाहत थांबली होती. प्रमोशनसाठी अनिल कपूर, अथिया शेट्टी, अर्जुन कपूर आणि इलियाना डी'क्रूज  'द कपिल शर्मा शो'च्या सेटवर पोहचले होते. परंतु, कपिल तिथं न दाखल झाल्यामुळे या सगळ्यांना प्रमोशन न करता माघारी फिरावं लागलं.

प्रकृती ढासळल्यामुळे कपिल सेटवर पोहचू शकला नाही, असं सांगण्यात येतंय. याआधाही 'जब हैरी मेट सेजल' या चि़त्रपटाच्या प्रमोशन दरम्यान कपिल शर्मा बेशुद्ध झाला होता, त्यामुळे शुटींग रद्द करून शाहरुख आणि अनुष्का परत गेले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, 'मुबारकां'ची पूर्ण टीम शुटींगसाठी वेळेवर उपस्थित होती. कपिल शर्मा वेळेवर न पोहचल्यानं त्याला जेव्हा कॉल करण्यात आला तेव्हा तब्बेत ठीक नसल्याचं त्यानं कळवल्याचं समजतंय.

 
या आधीही शाहरुख खान आणि अनुष्का शर्मा यांचा 'जब हैरी मेट सेजल' या चि़त्रपटांच्या प्रमोशनसाठी कपिलच्या शोमध्ये आले होते. ते दोघेही असेच निघून गेले. तेव्हा असे सांगण्यात आले की, शाहरुख आणि अनुष्का च्या येण्या आधीच कपिल शर्मा बेशुध्द झाले. त्यामुळे शुटींग रद्द केले.